शिक्षणाधिकारी यांनी शाळांना फी वाढीस परवानगी देऊ नये

0 83

पुणे, प्रतिनिधी – प्रत्येक वर्षी खाजगी शाळा त्यांच्या फीस मध्ये 10%वाढ करतात. यावर्षी कोरोनामुळे पालकांची आर्थिक परस्थिती संपूर्ण कोलमडली आहे. अनेक पालकांना त्यांची नौकरी गमवावी लागली आहे किंवा काही दिवस ब्रेक मिळाला आहे. या काळातील पगार त्यांना मिळणार नाही. अनेकांना आपले उधोगधंदे बंद करून घरात बसावे लागले आहे. शहरातील वार्षिक फीस 30हजार पासून 7लाखांपर्यंत आहे. 10%वाढ म्हणजे 3हजार ते 70हजार वाढ होणार आहे. हे पालकांना न परवडनारे आहे. अशीच परीस्थिती आणखी काही दिवस राहिली तर आहे ती फीस भरणे पालकांना अवघड होणार आहे. त्यामुळे शाळांनी आहे त्या फीस मध्ये 50%सूट दिली पाहिजे. यावर शिक्षणाधिकारी यांनी कठोर भूमिका घेऊन शाळांना फीस वाढवता येणार नाही व आहे त्या फीस मध्ये 50%सूट द्यावी असा जीआर काढला त्यांनी काढावा. याबाबतचे निवेदन ओबीसी फौंडेशन इंडियाचे सर्व जिल्हाध्यक्ष निवेदन देत आहेत.

error: Content is protected !!