शिक्षण क्षेत्रात उत्कंठा प्रलंबित विद्यापीठ परीक्षांची

0 82

परीक्षेची वाट पाहण्यापेक्षा नव्या गोष्टी शिका:तज्ञांचा सल्ला

पुणे – कोरोना विषाणू साथीच्या आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात,विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये उत्कंठा प्रलंबित विद्यापीठ परीक्षांची असून तोपर्यंत परीक्षेची वाट पाहण्यापेक्षा ती तयारी न विसरता जीवनावश्यक नव्या गोष्टी शिका,असा सल्ला शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी दिला आहे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

विद्यापीठ अनुदान आयोग या परीक्षांची आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या वेळा पत्रकाची तयारी सुरु असून कोरोना च्या साथीचा प्रादुर्भाव कमी होण्याची आणि सुरक्षित रित्या परीक्षा पार पाडण्याची तयारी सुरु आहे.त्यासाठी नियुक्त समितीने शिफारशी दिल्या असून स्थानिक परिस्थितीवर बऱ्याच गोष्टी सोडल्या आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

याविषयी बोलताना भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव म्हणाले,’ परीक्षा कधी होणार यावरून विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे.लॉक डाऊन उठण्याची वाट पाहिली जात आहे.डिजिटल व्यवस्था करून परीक्षा घेण्याची तयारी ठेवावी असे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले असले तरी सर्वत्र तशी तयारी नाही.विद्यार्थी एका गावात नसून विखुरलेले आहेत.सर्वत्र इन्टरनेट सुविधा चांगली असेलच असे नाही.अभियांत्रिकी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी गणितीय समीकरणे,ग्राफ,आकडेमोड करणे गरजेचे असून ते सर्व ऑन लाईन करणे जमले पाहिजे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने परीक्षा होणे योग्य ठरेल.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हेलपमेंट (आय एम इ डी ) चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर म्हणाले,’परीक्षा,नोकऱ्या,प्लेसमेंट आणि एकूणच भवितव्याबद्दल विद्यार्थी चिंताक्रांत आहेत. आम्ही ऑनलाईन अध्यापन आणि परीक्षा घेण्याची तयारी केली आहे. अशा वेळी निर्णय होईपर्यंत विध्यार्थ्यानी अभ्यासलेल्या गोष्टी विसरू नये.वेळ चांगला जाण्यासाठी अभ्यासक्रमाशी,करियरशी सुसंगत नव्या गोष्टी शिकणे योग्य राहील. अर्थ व्यवस्थेतील घसरण लक्षात घेता नवे रोजगार कितपत उपलब्ध होतील,याविषयी आताच सांगता येणार नाही’.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार म्हणाले,’ विद्यापीठ अनुदान आयोगाकडे काही शिफारशी आल्या असल्या तरी शिक्षण आणि परीक्षा याबाबत राज्य सरकारचे निर्णय काय असतील हे पाहणे महत्वाचे आहे. आम्ही त्या निर्णयांची प्रतीक्षा करीत आहोत.’

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

error: Content is protected !!