शिक्षण महर्षी स्व कृष्णराव काशिनाथराव जाधव साहेब यांची ६२ वी जयंती साजरी

0 96

कन्नड,प्रतिनिधी – जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा सचिव शिक्षण महर्षी स्व कृष्णराव काशिनाथराव जाधव साहेब यांची ६२ वी जयंती कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयात स्मृतिस्थळावर दादांच्या स्मृतीस अभिवादन करून व विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कोरोना च्या काळात सोशल डिस्टन्स ठेऊन जयंती साजरी करण्यात आली. तसेच दादांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.

 

कोरोना संसर्गाच्या काळात संस्थेने विविध उपक्रमातून कर्तव्याच्या भावनेतून समाजास विविध माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत म्हणून जयंतीच्या निमित्ताने धर्मवीर संभाजी कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने एकवीस हजार रुपयाचा चेक जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव साहेब यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी श्री जनार्धन विधाते साहेब मा तहसीलदार श्री संजय वारकड साहेब नायब तहसीलदार हारून शेख यांच्या कडे सोपविण्यात आला.

 

यावेळी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी वाघ, बाळासाहेब निकम, रावसाहेब निकम, आबासाहेब चव्हाण, प्रदीप सनान्से, जगन्नाथ जाधव, करण राठोड, सचिन भामरे व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

सावधान… मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, नागरिकांसाठी सरकारचे अलर्ट

 

error: Content is protected !!