शिवसेनेचे मंत्री अब्द्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण
सिल्लोड,संजय दांडगे : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना कोरोनाची लागण होण्याचे सत्र काही केल्या थांबतांना दिसत नाही. कांग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तार हे मुंबई येथील आपल्या शासकीय निवासस्थानी होम क्वारंटाइन असून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. दिनांक २१/०७/२०२० सत्तार यांनी रात्री ही माहिती फेसबुकच्या माध्यमातून दिली. कोरोनाच्या संकट काळात मतदारसंघातील नागरिकांना मदत करतांना चुकून प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता सत्तार यांनी वर्तवली आहे.
घाबरण्याचे कारण नाही, लिलावती रुग्णालयात डॉ.जलील पारकर यांच्या सल्याने मी उपचार घेत आहे, सद्या होम क्वारंटाइन असून काळजीचे कारण नाही. तुमच्या सर्वांच्या आशिर्वाद आणि सदिच्छांच्या पाठबळावर मी लवकरच बरा होऊन सेवेत रुजू होईल, असा विश्वास देखील सत्तार यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. थोडी शंका आल्यामुळे आपण चाचणी करून घेतली, दुर्दैवाने ती पॉझीटीव्ह आ्ल्याचे सत्तार यांनी फेसबुकच्या माध्यमातून सांगितले.
सत्तार हे गेल्या चार महिन्यापासून सिल्लोड-सोयगांव मतदारसंघ व पालकमंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या धुळे जिल्ह्यात सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून होते. मतदारसंघातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी सत्तार यांनी नगर परिषद, आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासनाच्या मदतीने कसोशीने प्रयत्न केले. मास्क, सॅनिटायजर, साबण, अन्नधान्य, किराणा सामानाचे वाटप यासह शहर ग्रामीण भागात निरज्ंतुकीकरण फवारणी करत त्यांनी अडीच तीन महिने कोरोनाच्या संकटाला रोखून धरले होते.
परंतु गेल्या महिनाभरात कोरोनाचा शहर व ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढला आणि सत्तार यांच्या मतदारसंघातही रुग्ण वाढले. कोरोनाचा मुकाबला करतांना नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी सत्तार यांनी नुकतीच मालेगावच्या जोशिंदा काढ्याची आर्डर देखील दिली. पहिल्या टप्यात वीस हजार नागरिकांना हा काढा देण्यात येणार आहे.
वडवणीतील जि.प.शिक्षकाच्या आयआयटीयन मुलाने करुन दाखवले