शिवसेनेच्या रक्तदान शिबीरात सहभागी व्हा -आप्पासाहेब जाधव

0 447

माजलगांव( प्रतिनिधी):-तालुका शिवसेनेच्या वतीने मा . मुख्यमंत्री ऊद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे साहेब , शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरकर साहेब , संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब , सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे , जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या सूचनेवरून सोशल डिस्टस व सर्व नियम पाळून रक्तदान शिबिर आयोजित करावीत असे आदेशित केल्यामुळे रक्तदान शिबीराचे दि . १३ जून शनिवार रोजी ग्रामीण रूग्णालय माजलगांव येथे आयोजन केले आहे .

या रक्तदान शिबीरला उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष अशोकराव होके पाटील तर अॅड . विनायक लवटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे . यामध्ये रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले आहे .

महाराष्ट्रात कोरोना साथरोगाची लागण मोठ्याप्रमाणावर पसरत असून यामध्ये म्हणून शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे . तरी इच्छुक रक्तदात्यांनी आयोजक आप्पासाहेब जाधव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे .

दुरावलेली नाती लॉकडाऊनमध्ये जुळली

 

error: Content is protected !!