शेतकऱ्यांना भेडसावनाऱ्या विविध समस्यां बाबत खा.डॉ.भारती पवार यांनी दिले कृषीमंत्री दादा भुसे यांना निवेदन
नाशिक , प्रतिनिधी – नाशिक जिल्हा परिषद येथे सध्या सर्वत्र पेरणी हंगाम सुरू आहे तर काही ठिकाणी पेरणी पुर्ण झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध झाले नसुन ते मिळविण्याकरीता अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांना संथ गतिने कर्ज वाटप चालु आहे. यासंदर्भातही योग्य ती पावले उचलुन शेतकऱ्यांना त्वरीत कर्ज मिळण्यासाठी संबंधीत बॅंकांना आदेश करावे.
पेरणीसाठी दिले गेलेले बियाने निकृष्ट दर्जाचे असल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झालेल्या असुन अनेकांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झाले आहे. अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी व त्यांना चांगल्या प्रतीच्या बियानांचे वाटप करण्यात यावे. शेती पिकासाठी लागणारा युरिआ व रासायनिक खते शेतकऱ्यांना मिळत नसुन ते मिळविण्यासाठी त्यांना इतर मार्गाने जास्त किंमत मोजावी लागत आहे.
त्याचप्रमाणे सरकारी नियमानुसार खते खाजगी गोदामात न ठेवता सरकारी गोदामातच ठेवण्यात यावे. तसेच केंद्रीय मुलभुत खरेदी योजनेंतर्गत मका खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण झाले असुन शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीचा मका शिल्लक आहे. यावर राज्य शासनाने केंद्राकडे वाढीव मका खरेदी करण्यासाठी मागणी करावी.
त्याचप्रमाणे केंद्र सरकारचा अद्यादेश असताना शेतकरी कृशीमाल कोणत्याही शहरात कोणत्याही बाजार पेठेत विकु शकतो तरी देखील नाशिक शहरात शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व बाहेर पोलीस यंत्रणा कृषी माल विकण्यात मज्जाव करताना अट्टल गुन्हेगारांपेक्षाही वाईट वागणुक देत आहेत. बाजार समिती सर्व शेतमाल आपल्या आवारात विकण्यास परवानगी देत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
अषा नानाविध समस्यांना शेतकऱ्याला तोंड द्यावे लागत असुन यावर त्वरीत उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा मिळवुन द्यावा असे निवेदन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना नाशिक जिल्हा परिषद येथील आढावा बैठकित खा.डॉ.भारती पवार यांनी दिले व यावर तातडीने आपल्या स्तरावर योग्य निर्णय वंचित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
‘या’ दिवशी लागणार बारावीचा निकाल
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});