शेतकऱ्यांसाठीच्या ऑनलाईन सेवा त्वरित चालु करा-स्वातीताई मोराळे

0 75

उस्मानाबाद – महाराष्ट्रसह संपूर्ण भारत भर कोरोनाने थैमान घातले आहे. यावर आजपर्यंत कोणतीही लस उपलब्ध करण्यात जगाला यश आलेले नाही. कोरोनटाईंन करणे सोशल डिस्टन्स ठेवणे याच उपाय योजना व नियंत्रण ठेवणे मानवाच्या हाती राहिले आहे. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने जनता करफ्यु, होम कोरोनटाईन, जिल्हाबंदी,कर्मचारी कामात कपात, ऑनलाईन कामे बंद केली आहेत याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
ऑनलाईन कामे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा बंद झाल्या आहेत. नविन मोटार, ड्रीप, विहिरी, शेततळे, पाईपलाईन, कांदाशेड, वेअरहाऊस ही कामे पाऊसा अगोदर करणे गरजेचे असते. अगोदरच शेतकरी तयार भावाला बाजार व भाव मिळाला नाही त्यामुळे अडचणीत आला आहे. नवीन पिकांची तयारी करणे शेतकरी शेती सुविधा मिळवण्यापासून वंचित राहत आहे. कोलमडलेली अर्थ व्यवस्थतता रस्त्यावर आणण्याचे सामर्थ्य ज्या शेतकऱ्यांमध्ये आहे त्यांना वेळीच मदत मिळाली नाहीतर अर्थ व्यवस्थतता आणखी बिघडेल यामुळे ऑनलाईन सेवा त्वरित चालु कराव्या असे आव्हान मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून करण्यात आले आहे.मा. गुलाबराव पाटील(स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री )यांच्याशी संपर्क साधून स्वाती मोराळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत.

error: Content is protected !!