शेतातील बैल जोडीसह गाय-गोर चोरीला; शेतकऱ्यावर पेरणीचे संकट
मजलगांव,प्रतिनिधी:- खरीपाच्या पेरणी पुर्व मशागतीची कामे पुर्णत्वास नेत पेरणीसाठी तयारी सुरु झाली असताना माजलगांव तालुक्यातील बेलूरा येथील शेतकऱ्याच्या बैल जोडीसह एक गाय ,गोर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. चोरीच्या घटनेची मिळालेली माहिती अशी की, बेलूरा गावातील शेतकरी आश्रुबा राजाराम फपाळ यांच्या बेलूरा शिवारातील गटनं.३८१ मधील स्थानिक नाव हाडूळा शेतातील कोठ्यावर बांधलेली उपरोक्त जनावरे २३मे शनिवार रोजीच्या रात्री ११वा.ते २४मे रविवार रोजीच्या सकाळी ६वा.च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची फिर्याद आश्रुबा फपाळ यांनी २४मे रविवार रोजी दिंद्रुड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, त्यांचे दोन बैल ज्यांचा रंग तांबडा व जांभळा असुन यांची अंदाजे किंमत ५५ हजार रु.एक हरिण रंगाची गाय जीची किंमत १० हजार रु. एक ५हजार रुपये किंमतीचे गोर. अशा एकूण ७७हजार रुपये किंमतीच्यबैल बारदाण्याची चोरी झाली आहे.
यावरून अज्ञान चोरट्यां विरोधात भादंवि. कलम ३७९प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन बैल बारदाण्याचा तपास पोउपनि. नाचण करत आहेत. दरम्यान खरीपाच्या पेरणी पुर्वीच बैल जोडी चोरीला गेल्याने आश्रुबा फपाळ यांच्या पुढे पेरणीचे गंभीर संकट उभे राहिले आहे.
भुसावळ मंडळातील रेल्वे आरक्षण कार्यालयांवर गर्दी न करण्याचे आवाहन