श्री क्षेत्र सरला बेटावर १७३ व्या सप्ताहाचे ध्वजारोहन संपन्न…
वैजापूर, प्रतिनिधी – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सरला बेटावर २४ जुलै ते ३१ जुलै दरम्यान होणा-या योगीराज गंगागिरी महाराज यांच्या १७३ व्या सप्ताहाचे ध्वजारोहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महंत रामगीरीजी महाराज यांच्या हस्ते रविवारी रिमझिम पावसात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
गिनीज बुकमध्ये नोंद असलेला योगिराज गंगागिरीजी महाराज यांचा अंखड हरिनाम सप्ताह यावेळी मात्र कोरोना महामारीच्या संकटामुळे या सप्ताहाचे आयोजन बेटावर करण्याचे महंत रामगीरी महाराज यांनी नुकतेच पुणतांबा येथे जाहीर केले होते.या सप्ताहाचे सर्व कार्यक्रम बेटावरील पन्नास विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडेल. कोणत्याही भाविकांनी बेटावर येऊ नये.
घरीच राहून सप्ताहाचा आनंद घ्यावा यासाठी टीव्ही व मोबाईलवर व सोशल मिडिया,व्हाट्सप, फेसबुक वर थेट प्रेक्षपण करण्यात येईल. वृत्तपत्रात बातम्या येतील तशी सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रशासनच्यावतीने गोदावरी नदीच्या पुलावर पोलीस बदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.त्यामुळे साप्ताहाला बेटावर कुणीही येऊ नये असे आवाहन महंत रामगिरीजी महाराजांनी केले.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,सप्ताह समिती अध्यक्ष वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरनारे, औरंगाबादचे माजी बांधकाम सभापती संतोष जाधव,माजी सभापती बाबासाहेब जगताप, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती,जि.प.सदस्य पंकज ठोंबरे,वंदना मुरुकुटे, पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, बाबासाहेब चिडे,कमलाकार कोते,सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, सोमनाथ महाराज, माऊली महाराज, विलास महाराज, प्रदिप साळुंके, दत्ता खपके ,आदी उपस्थित होते.
‘डिजीटल स्त्री शक्ती’ : 5000 तरुणी होणार ‘सायबर सखी’