श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे HSC परीक्षेत घवघवीत यश

0 145

आळंदी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवार दिनांक 16/07/2020 रोजी दुपारी 1 वा. जाहीर झाला, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु.काॅलेज प्रशालेतील १२ वी कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली.

प्रशालेचा निकाल पुढीलप्रमाणे
कला शाखेचा शेकडा निकाल : 90.42 %(एकूण 94 विद्यार्थ्यांपैकी 85 विद्यार्थी उत्तीर्ण )कला शाखेमध्ये कु.मीरा वैजनाथ फड या विद्यार्थिनीने 650 पैकी 528 गुण (81.23%) मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कु. उत्कर्ष उमाकांत सूर्यवंशी या विद्यार्थ्याने 650 पैकी 510 गुण (78.46%) मिळवून द्वितीय तर कु. वैष्णवी उद्धव सोनवणे या विद्यार्थिनीने 650 पैकी 506 गुण (77.84%) मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

तसेच वाणिज्य शाखेचा शेकडा निकाल : 97.72 %(एकूण :88 विद्यार्थ्यांपैकी 86 विद्यार्थी उत्तीर्ण )वाणिज्य शाखेमध्ये कु. सृष्टी रोहिदास मुंगसे या विद्यार्थिनीने 650 पैकी 518 गुण (79.69%) मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कु. शिवानी पांडुरंग जाधव व विशाल दादासाहेब चाकने या विद्यार्थ्यांनी 650 पैकी 517 गुण (79.53%) मिळवून द्वितीय तर कु. हर्षदा किसन म्हस्के या विद्यार्थिनीने 650 पैकी 514 गुण (79.07%) मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसाठी सतत प्रयत्नशील असणारा गुणवत्ता विभाग, त्या अंतर्गत उपक्रमशील इ.12 वी कला व वाणिज्य विभागातील सर्व वर्गशिक्षक, विषयशिक्षक, मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, उपाध्यक्ष विलास कुऱ्हाडे, सचिव अजित वडगांवकर,खजिनदार डॉ.दिपक पाटील, सर्व विश्वस्त, सदस्य आदींनी अभिनंदन केले.



error: Content is protected !!