संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हरिग्राम येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
खडकवासला,दि 12 (प्रतिनिधी)ः
संतोष पाटील पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य विलास फडके आले होते त्यावेळी यांनी शब्द दिला होता की, ते करवली वाडी शाळा हरिग्राम येथील आदीवाशी समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले.त्यांनी दि: ११ऑगस्ट वार बुधवार या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करवली वाडी हरिग्राम या शाळेतील आदीवाशी विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, मा सरपंच अरूण पाटील, मा सरपंच बाळाराम पारधी, ज्येष्ठ नेते आदीवाशी वाडीतील बबन पारधी, जिल्हा परिषद शिक्षक सुधीर डागंरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सारिका पाटील तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त संतोष पाटील पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले.