संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुका समाधीजवळ विसावल्या

0 125

आळंदी देवाची – संत ज्ञानेश्वर महाराजांचा यंदाच्या पालखी सोहळा कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून पालखी सोहळा दिनांक १३ जून रोजी ५० वारकर्‍यांच्या उपस्थितीत प्रस्थान होऊन दशमी पर्यंत आळंदीत दर्शन मंडपात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुका विसावल्या होत्या, दशमीला २० वारकर्‍यांच्या उपस्थितीत पंढरपूर कडे चल पादुका मार्गस्थ झाल्या, आषाढी एकदाशी करुन द्वादशीला पंढरपूर वरुन आळंदी कडे मार्गस्थ झाली रात्री पावणे दहा ला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुका मंदिरात कारंजा मंडपात विसावली. आज परंपरे नुसार दशमीला माऊलींच्या चल पादुका मंदिरात प्रदिक्षणा होऊन संत ज्ञानेश्वर महाराज समाधी जवळ विसावल्या यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार, राजेंद्र पवार,व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, श्री चे चोपदार बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, मानकरी योगिराज कुऱ्हाडे, योगेश आरु, राहुल चितालकर, स्वप्नील कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डि.डि.भोसले पा. ईत्यादी उपस्थित होते . उद्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मुखवटा मंदीरात प्रदिक्षणा होऊन मुक्ताबाई मंडपात हजेरी चा कार्यक्रम होऊन पालखी सोहळा पुर्ण होईल असे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार यांनी सांगितले.



error: Content is protected !!