संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत विनामूल्य आरोग्य शिबीर संपन्न
जळगाव, भुषण जाधव – जळगाव येथील संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत श्री संत बाबा गुरुदासराम यांच्या ८९ व्या जन्मदिवसानिमित्य दिनांक 15 जून 2020 रोजी नेत्रज्योती चॅरिटेबल हॉस्पिटल मध्ये विना मूल्य आरोग्य शिबीर संपन्न झाले. सदर शिबिरास 56 नेत्र रुग्णांची तपासणी केली. त्या पैकी 21 रुग्णांची मोतीबिंदू शस्रक्रियेसाठी निवड झाली असून त्यांच्या वर मोफत शस्रक्रिया करण्यात येणार आहे.
तसेच १७ दंत रुग्णांची, ३३ जनरल रुग्णांची तपासणी करण्यात आली. व १२ रुग्णांवर विनामूल्य फिजिओथेरपी करण्यात आली.या शिबिरात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.श्रुती जोशी, दंतरोगतज्ज्ञ डॉ.शेख अब्दुल रज्जाक ,डॉ.मोहनलाल साधरिया व फिजिओथेरपी डॉ.प्रणिता भावसार इत्यादीने सहकार्य केले. शिबीर संपन्नते साठी संस्थेचे मा.आ.श्री.गुरुमुख जगवाणी, व्हा.चेअरमन श्री.दिलीपकुमार मंधवानी, सचिव डॉ.मलचंद उदासी ,बाबा गरिबदास मंदिराचे सर्व ट्रस्टी गण व नेत्रज्योती हॉस्पिटलचे श्री.धनंजय चावला, श्री.रमेशलाल मंधान, श्री.मनोहरलाल जाधवानी, श्री.शंकरलाल थौरानी, श्री.रमेशलाल परप्यानी, श्री.करतारलाल पारप्यानी व श्री.कैलास मंधवानी, समस्त कर्मचारी वृंद श्री.नितीन झोपे, श्री.दीपक राजपूत, श्री.दिलीप साकरे तसेच सौ.जया रेजडा, डॉ.सुरेश सराफ व नेत्रज्योती हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.