समाजातील गरजूंना आर्थिक मदतीचे वाटप

0 173

माजलगांव, प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेक लोकांना हाताला काम नसल्याने समाजातील अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे समस्त ब्राम्हण समाजाचे वतीने येथे डॉ.प्रशांत पाटील यांच्या निवासस्थानी तालुक्यातील ब्राम्हण समाजातील गरजु अशा ४७ व्यक्तींना दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी पाचशे रुपयाची मदत सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करून करण्यात आली.
यावेळी कवी प्रभाकर साळेगावकर, पत्रकार सुधीर नागापुरे, डॉ.स्वानंद कुलकर्णी, डॉ.किशोर रत्नपारखी, डॉ.सचिन देशमुख, दामोदर संदीकर, सुधीर देशमुख यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला थोर समाजसेविका अँड.अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या काल झालेल्या दुःखद निधनामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी श्रध्दांजलीपर बोलताना प्रभाकर साळेगावकर सरांनी त्यांच्या उतुंग कार्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला.
दि.२५एप्रिल रोजी परशुराम जयंतीनिमित्त पहिल्या टप्प्यात विनायक रत्नपारखी यांच्या निवासस्थानी तालुक्यातील गरजु ब्राह्मण यांना प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे ५५ जणांना आर्थिक मदतीचे वाटप सोशल डिस्टन्सनचे पालन करत करण्यात आले होते. व सिद्धीविनायक अर्बनच्या वतीने एक हजार मॉस्कचे वाटप केले होते. या दोन्ही कार्यक्रमाला समाजातील अनेकांनी उपस्थिती लावली व समाजातील अनेक लोकांनी यासाठी आर्थिक योगदान दिले. एकूण शंभर पेक्षा अधिक लोकांना आर्थिक मदत केल्यानंतर समाजातील गरजु लोकांना मदत सुरूच राहणार असल्याचे कमिटीतर्फे सांगण्यात आले.
या दोन्ही कार्यक्रमाचे नियोजन दत्ता महाजन, आनंद कुलकर्णी, कैलास जोशी, निरंजन वाघमारे, बंडू देशमुख, मुकुंद जोशी, विनायक रत्नपारखी व डॉ.प्रशांत पाटील यांनी केले.

error: Content is protected !!