सहज सुचलं
माणसाच्या आयुष्यात अनेक वादळ येणाऱ्या घटना घडत असतात….बऱ्याचदा आपली काहीही चुक नसतांना आपल्याला ह्या वादळाचा सामना करावा लागतो….
का येतात अशी वादळं आपल्या आयुष्यात…. तर क्षणीक मोहाला आपण बळी पडतो…चुक समोरच्याची पण असते….आपली पण असते…पण भोगायला फक्त आपल्याला लागतं….कारण आपल सहनशील व्यक्तीमत्व…..असं म्हणतात की जेव्हढा अपमान, अत्याचार करणारा दोषी असतो….तेव्हडाच दोषी ते सहन करणाराही असतो…. अशा घटना जेव्हा आपल्या आयुष्यात घडतात तेव्हा आपल्याला खुप काही शिकवून जातात…कधी सावरल्या जातो…तर कधी आयुष्य पणास लागतं… आणि माणूस आत्महत्या करावी ह्या विचारापर्यंत पोहोचतो…सगळं नकळत झालेलं असत…पण आयुष्याच्या अंतापर्यंत सोबत राहातं…कळत नकळत….
आवरु जाता आवरत नाही
सावरु जाता सावरत नाही
अस कसं हे वेड मन
ज्याचा कधिच थांगपत्ता लागत नाही
पण आयुष्यात हरायचं नसतं…. जिथे प्रश्न निर्माण होतात…तिथे त्याची उत्तरे सुध्दा असतात…आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण हा तुम्हाला काहीतरी शिकवून जातो…तो क्षण तुम्हाला जगण्याची दुसरी संधी उपलब्ध करुन देत असतो…त्या संधीचं सोनं करायला हवं…माझी एक मैत्रीण मला सारखं समजावते की तू खुप साधी आहेस…सरळ आहेस….सांभाळून राहायला शिक… शिकतेय मी हळूहळू….जमेल तस…पण जिवावर बेतायला नकोय….फक्त एव्हढच हवयं…..
जिंदगीने जो लम्हे दिये है
उन लम्हो की शुक्रगुजार हूं मै
किसी का कूछ़ बूरा ना हो
बस इसकी तलफगार हूं मै
सौ.अलका माईणकर