सिद्धीविनायक अर्बन तर्फे किराणा व अन्नधान्य किटचे वाटप

0 188

माजलगांव, प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत देशात सर्वत्र लॉक डाऊन लागल्यामुळे सिद्धीविनायक अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगांवच्या वतीने तिसऱ्या  टप्प्यात ६० किराणा व अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. हे एक किराणा व अन्नधान्य किट घरातील चार व्यक्तींसाठी आठ दिवस पुरेल असे तयार करून एकूण २४० गरजु नागरिकांना पुरेल इतके वाटप करण्यात आले.

शेतातील वेड्या बाबळी पासून कोळसा तयार करणारे आदिवासी समाजातील आठ कुटुंब माजलगांव नवा मोंढा परिसराच्या पुढे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन लागल्यामुळे अडकून पडलेले आहेत. त्यांना राहायला छत नाही की खायपियाला अन्न नाही अशा आठ कुटुंबाला व लोखंडी डब्या पासून चाळण्या तयार करून त्या विक्री करून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या पण कोरोना विषाणूमुळे भारतात लॉक डाऊन झाल्यामुळे आपल्या सह लेकराबळांना काय अन्न खाऊ  घालावे असा यक्ष प्रश्न पडलेल्या केसापुरी भागात अडकून राहिलेल्या कुटुंबाला त्यांच्या वस्तीवर जाऊन व माजलगांव पंचक्रोशीतील सर्व जाती-धर्मातील अपंग, अनाथ, कष्टकरी, गरीब व गरजु कुटुंबातील नागरिकांना सिद्धीविनायक अर्बन माजलगांव तर्फे तिसऱ्या टप्यात मोठ्या प्रमाणावर किराणा व अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले
या किटमध्ये तांदूळ, तुरदाळ, पोहा मुरमुरे, शेंगदाणे, गोडेतेल, साखर, पत्तीपुडा, मिरची पावडर, मिठ पुडा, अंगाची साबण, कपड्याची साबण, आशा अकरा वस्तू देण्यात आल्या.  यापूर्वी पहिल्या टप्प्यात सिद्धीविनायक अर्बन तर्फे माजलगाव येथे एक हजार मॉस्कचे वाटप करण्यात आले होते, तर दुसऱ्या टप्यात चिंचाळा ता.वडवणी परिसरातील गावांमध्ये २४० नागरिकांना किराणा व अन्नधान्ये किटचे वाटप करण्यात आले होते.

संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष दत्तात्रय देशमुख, संस्थेचे जेष्ठ संचालक डॉ.प्रकाश पाटील संस्थेचे सचिव निरंजन वाघमारे, संस्थेचे संचालक तथा माजलगाव न.प. पाणीपुरवठा सभापती विनायक रत्नपारखी, संचालक कैलास जोशी, गोरख मेंडके, विठ्ठल कांबळे, संस्थेचे सल्लागार तथा भाजपा सोशल मिडिया बीड जिल्हा संयोजक दत्ता महाजन, अनिल गोंडे, यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
सिद्धीविनायक अर्बन तर्फे घेण्यात आलेल्या या सामाज उपयोगी कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे नेते तथा अंबा साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेशराव आडसकर साहेब, भारतीय जनता पक्ष माजलगाव तालुका अध्यक्ष अरुण आबा राऊत, माजलगांव मधील जेष्ठ तथा प्रसिद्ध डॉक्टर शंकर जुजगर, माजलगाव पंचक्रोशीतील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ तथा सिद्धीविनायक अर्बनचे सल्लागार डॉ.स्वानंद कुलकर्णी अनंत शेंडगे, जनकल्याण विकास प्रतिष्ठानचे नितीन क्षिरसागर सातलींग अप्पा खिल्लारे यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारत देशात केलेल्या लॉक डाउन मुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे अशा वेळी गरजवंत तथा कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून गरजू शेतमजूर, कष्टकरी, गरीब कुटुंबांना आठ दिवस पुरेल इतके किराणा व अन्नधान्य स्वरूपात जिवनावश्यक वस्तूंचे वाटप सिद्धीविनायक अर्बन माजलगाव तर्फे करण्यात आले. किटचे वाटप करीत असताना शासनाने सांगितलेल्या सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले.


यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांनी सर्व नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगुन मॉस्कचा वापर करावा, आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करून त्याचा वापर करावा व सॅनिटायझर किंवा साबणाने सतत हात धुत जावे अशी विनंती वजा सूचना केली. तर रमेशराव आडसकर साहेबांनी सर्वांना स्वावलंबी व्हा, कुठलेही वेसण करू नका व कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने सांगितलेले सर्व नियम पाळा असे सुचवुण सिद्धीविनायक अर्बन करत असलेल्या समाज उपयोगी कामाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाचे कौतुक करून आभार मानले.

सिद्धीविनायक अर्बन तर्फे सतत समाज उपयोगी कार्यक्रम होत असल्याने माजलगांव मतदार संघाचे मा.आमदार मोहन काका सोळंके यांनीही संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांना कॉल करून त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी जनकल्याण प्रतिष्ठानचे नितीन क्षिरसागर, दत्ता महाजन रवींद्र पाटील, उदय पाटील, विनय पाटील, दिगांबर वाघमोडे प्रवीण पाटील व  सिद्धीविनायक अर्बनच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



error: Content is protected !!