सुरगाणा तालुक्यतील कोरोनामुक्ती करीता सरसावले सामाजिक कार्यकर्ते
सुरगाणा – लाडगाव-सुरगाणा हे आदिवासी बहूल तालुके सुरगाणा हा चौदा पैकी अद्यापही कोरोनामुक्त आहे मात्र कोरोनाचा प्रसार हा भविष्यात सरकारी कार्यालयातील बाबुकडूनच होणार की काय ? अशी भीती आदिवासी बांधवाकडून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्यांकडे निवेदनाद्वारे कर्मचारी यांनी मुख्यालयी राहण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. शासनाने निर्धारित केलेल्या लाॅकडाऊनी प्रभावीपणे अंमलबजावणी करत आज पर्यंत तालुका कोरोनामुक्त राखण्यात यश आले आहे.तालुक्यातील जनता कोरोनामुक्त राहण्याकरीता सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.भविष्यात विविध कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांच्या कडूनच आदिवासी भागात कोरोना पसरु शकतो याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील बरेचसे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत ते नाशिक, मालेगांव,सिन्नर, चांदवड,येवला तसेच कोरोनाग्रस्त भागातून ये- जा करीत आहेत.यामध्ये महसूल विभाग,तालुका कृषी विभाग,पंचायत समिती,पाणीपुरवठा, आरोग्य,शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग,पोस्ट कार्यालय, आदिवासी विकास विभाग आदी कार्यालयातील अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी मुख्यालय न राहता ये जा करीत आहेत. कार्यालयातील कामानिमिताने यांचा आदिवासी जनतेशी नेहमीच संपर्क येतो. त्यामुळे कोरोना संक्रमणाची भीती आदिवासी जनतेला वाटत आहे.या सरकारी बाबूनां मुख्यालयी राहण्याची सक्ती केली जावी. जे मुख्यालयी राहत नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता,घरभाडे भत्ता,प्रत्साहनपर दिला जाणारा भत्ता या सवलती बंद करण्यात याव्यात. जे कर्मचारी ये जा करतात त्यांची वाहने तालुक्याच्या प्रवेश सिमावर वणी ते सापुतारा गुजरात महामार्गावर नागझरी फाटा,बोरगाव,हतगड, जाहुले, बुबळी या ठिकाणी जनतेच्या वतीने नाकाबंदी करण्यात येऊन ये जा करणाऱ्यांना जनताच जाब विचारील असे केल्यास शासकीय कामात अडथळा आणला म्हणून आंदोलकावर कारवाई यासारखी कोणतीही सबब जनता ऐकून घेणार नाही. कर्मचारी स्थानिक पातळीवर मुख्यालयी राहिले तर शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी छलद गतीने होऊन तालुक्याच्या विकासास हातभार लागेल अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर आदिवासी सेवक चिंतामण गावित,शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे,ज्येष्ठ नेते गोपाळराव धुम,भिका राऊत,पांडुरंग गायकवाड,आनंदा झिरवाळ,हरिभाऊ भोये, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार,भाजपा तालुका प्रमुख सुनिल भोये, पंचायत समिति सदस्य एन.डी.गावित,नगरसेवक रमेश थोरात आदिंच्या सह्या निवेदनावर आहेत. निवेदनाच्या प्रती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आमदार नितीन पवार,तहसिलदार विजय सुर्यवंशी,पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे,गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना देण्यात आल्या आहेत.
परळी शहर आणि संलग्न गावात कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ संचारबंदी लागू–जिल्हाधिकारी राहुल रेखावार
परळी शहरात कोरोनाचा समुह संसर्ग टाळण्यासाठी १ लाख ३३ हजार लोकसंख्येचे आरोग्य सर्वेक्षण