सुहास भावसार यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

0 161

निफाड,दि 28 (प्रतिनिधी)ः
शिक्षक दिनाचे औचित्य साधून ब-याच संस्था शिक्षकांचा उचित सन्मान करतात. पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळते. आपल्या कामालाच देव मानून मुलांमध्ये देव शोधणारे अगणित आहेत आणि असतात.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी(रजि.ट्रस्ट.) मुंबई यांचे मार्फत दिला जाणारा “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार” रयत शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती माध्य. व उच्च माध्य. विद्यालय वनसगाव ता.निफाड जि. नाशिक या शाखेतील उपक्रमशील, विद्यार्थी व लोकप्रिय आणि तंत्रस्नेही शिक्षक श्री सुहास भावसार यांना जाहीर झालेला आहे.
हा पुरस्कार सोहळा दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी online होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे समारंभाध्यक्ष पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा आणि संस्थापक अध्यक्ष ॲड. कृष्णाजी जगदाळे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
श्री सुहास भावसार यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या पुरस्काराबद्दल वनसगाव विद्यालयाचे प्राचार्य निकाळजे बी.डी, पर्यवेक्षक के बी दरेकर, सर्व शिक्षक व सेवक वृंद, विद्यार्थी व पालक, वनसगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, वनसगाव ग्रामपंचायतचे सरपंच मा सरपंच उन्मेष डुंबरे, सरपंच महेश केदारे, उपसरपंच सरला शिंदे, सारोळे खुर्द सरपंच दत्तात्रय डुकरे पाटील, कोटमगाव सरपंच तुकाराम गांगुर्डे, स्थानिक स्कूल कमिटीचे अशोकराव डुंबरे,राणुजी कापडी, शिवाजी नाना शिंदे, सर्व सदस्य,मनेष शिंदे, डॉ योगेश डुंबरे, डॉ चंद्रशेखर सातभाई, अशोक भोसले, सतिश भोसले, अरुण कापडी, अशोक निरभवणे, विशाल जावळे ,संदीप औटे, केदारे आर.के, सोनवणे मिलिंद, नंदकिशोर गायकवाड, पिलगर एम.के, तेलोरे सर, तुपे सर, शिंदे अनुसंगम, अनिल भावसार, राजेंद्र चाफेकर, प्रसाद भावसार, अमित भावसार, मुकुंद भावसार, प्रदीप भावसार, प्रशांत शिरसाठ,धामणे बी वाय व सर्व मित्र परिवार तसेच विश्वगामी पत्रकार संघ, विश्वगामी नाशिक जिल्हा माध्यमिक संघ, रयत सेवक मित्र मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व सर्व सदस्य यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!