सेलू तहसील परिसरात राज्य तलाठी संघ सेलूच्या वतीने तब्बल ३१०० झाडांचे घन वन पद्धतीने वृक्षारोपण !!

0 194

सेलू, प्रतिनिधी –  सेलू उपजिल्हाधिकारी मा.श्री.उमाकांत पारधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेलू तालुका तलाठी संघाच्या वतीने मा.मुकुंद आष्टीकर यांच्या पुढाकाराने सेलू शहरातील तहसील कार्यालय परिसरात मोरया प्रतिष्ठान परिवाराच्या सहकार्याने तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करत एकाच ठिकाणी २५ स्वदेशी जातींच्या तब्बल ३१०० झाडांचे घन वन विकसित करून पर्यावरणाची आवड असलेल्या मा.उपजिल्हाधिकारी यांना वाढदिवसाची अनोखी भेट देण्यात आली आहे.

सेलू तालुक्यातील नागरिकांना या घन वनातून पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी या दृष्टीने तहसील कार्यालय परिसरात हे घन वन साकारण्यात आले आहे.
या घन वन प्रकल्पासारखाच ८००० झाडांचा प्रकल्प सेलू तालुक्यातील पिप्रुळा या गावा शेजारी असलेल्या शासकीय जमिनीवर महाराष्ट्र तलाठी संघ शाखा सेलूच्या वतीने साकारण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

शासकीय पातळीवर विकसित केला गेलेला हा घन वन प्रकल्प भविष्यात सर्वांसाठी पर्यावरणाबद्दल नक्कीच आवड निर्माण करणारा ठरेल हे नक्की !!

परळी शहरामध्ये संचारबंदी आदेश 14 जुलै 2020 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत कायम

 

error: Content is protected !!