सोळंके कारखाना प्रलंबित मागण्या मान्य करणार
२८ जुलैला बैठक
भाई सोळंके यांच्या आंदोलनास यश
माजलगांव, प्रतिनिधी:- शेतकरी, टायरगाडीवान व उसतोड मजुरांच्या सोळंके कारखान्याकडे प्रलंबित मागण्या होत्या. याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई लक्ष्मण सोळंके यांनी आज दि. २० सोमवारी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. याची कारखाना प्रशासनाने दखल घेत २८ जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन तशा आशयाचे पत्र श्री. सोळंके यांना देण्यात आले आहे.
सोळंके कारखान्याकडून गाळप हंगाम २०१५ते आजपर्यंत टायरगाडीच्या बैलांचा व उसतोड मजुरांचा प्रतिवर्षी विमा किती भरल्या जातो, त्यांच्याकडून किती वसुल केला जातो तसेच प्रतिवर्षी वाटप किती केला जातो याची माहिती पावत्यासह लेखी स्वरूपात देण्यात यावी, मतदारसंघातील तीन्ही साखर कारखान्यावर शेतक-यांच्या उसाला समाल दर द्यावा यासह सोळंके कारखान्याकडे अनेक प्रलंबित मागण्याबाबत २०जुलै रोजी उपोषणाचा इशारा दिला होता.
परंतु कारखाना प्रशासनाने याची दखल घेत उपोषणस्थळी भेट देत २८ जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत गतवर्षीच्या गाळप हंगामातील उस बिलाचा प्रश्न देखिल मार्गी लागणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई लक्ष्मण सोळंके यांनी दिली आहे. दरम्यान श्री. सोळंके यांनी उपोषणाचा इशारा देताच कारखाना प्रशासन नमले असुन विवीध मागण्यांबाबत २८ जुलै रोजी बैठक होणार असल्याचे आंदोलनास यश आले आहे.
शिवसेनेचे मंत्री अब्द्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण