स्वप्निल बागुल ह्यांच्यातर्फे अंबरनाथमध्ये “अर्सेनिक अल्बम-३०” होमियोपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप

0 296

अंबरनाथ, जाफर वणू – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरीता कोविड-१९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून होमिओपॅथिक कंपनीकडून “अर्सेनिक अल्बम-३०” च्या गोळ्या मनसे माजी नगरसेवक तथा माजी सभापती स्वप्निल बागुल ह्यांनी अंबरनाथ शहराकरिता मागविण्यात आले होते. कारण या “कोरोना वायरस” च्या संसर्ग टळत नसल्यामुळे अंबरनाथ शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे लक्षात येताच आमचे लाड़के माजी नगरसेवक स्वप्निल बागुल ह्यांनी प्रत्येक विभागातील सर्व सोसायटीत घरोघरी जाऊन नागरिकांना याची माहिती देत दि.27 मे 2020 रोजीपासून आपण परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा तक्रारी नुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्याकडून डोस बनवून (उदा. डायबेटिक, बिपी, हायपर टेंशन साठी वेगळ्या गोळ्या व डोस) ह्या गोळ्या आज पर्यंत वाटप केले आहे. या गोळ्या वाटप करतेवेळी सोशल डिस्टेंसिंगची विशेष काळजी घेण्यात आली असुन याचा लाभ परिसरातील संपूर्ण नागरिकांनी घेतला आहे.

आता लॉकडाऊन उगड़ल्याने नागरिकांना नोकरी, काम धंद्यासाठी बाहेर पडावे लागत आहेत. परंतु कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसांदिवस आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी ह्या गोळ्यांचे सेवन करावे. तसेच ज्या नागरिकांना अजुन देखील गोळ्या हव्या असतील त्यांनी कळवावे व सोबत आरोग्याची माहिती पाठवावी. त्यानुसार आम्ही डोस बनवून गोळ्या घरपोच देण्यात येणार असल्याची माहिती स्वप्निल बागुल ह्यांनी दिली.

त्याचबरोबर या गोळ्या कश्या घ्यायचे 1) सलग तीन दिवस सकाळी उपाशीपोटी दिवसातुन एकदा 4 गोळ्या घ्याव्यात. 2) गोळ्या झाकणात काढून जिभेवर ठेवाव्या हात लाउ नये. 3) गोळ्या पाण्यासोबत घेऊ नये. 4) गोळ्या घेण्या अगोदर किवा घेतल्यानंतर 30 मिनिटे काहीही खाऊ पिऊ नये. तसेच ह्या औषधामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ति वाढते व कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होतो. या होमियोपॅथिक औषधाचा कोणताही साइट इफेक्ट होत नसल्याचे माजी नगरसेवक स्वप्निल बागुल ह्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच प्रभागातील नागरिकांनी ह्यांचे आभार व्यक्त केले.

matrimonial वेबसाईटवर जोडीदार शोधताय ? मग हे नक्की करा

शालेय शैक्षणिक वर्षाला सुरुवात; कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा प्रत्यक्ष सुरु होणार



error: Content is protected !!