हिंगणघाट येथील भीमनगर लौटन चौकातील पुल तुटला
हिंगणघाट,दि 15 ः
हिंगणघाट येथील भीमनगर लौटन चौक मुख्य मार्गांवरील पूल गेल्या तीन महिन्यापासून तुटलेल्या अवस्थेत असून नगरसेवकांचे व नगर पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
पुलाचे बांधकाम चार महिन्यापूर्वी झाले होते पण पूल एकाच महिन्यात जड वाहुतुकी मुळे तुटण्यात आला. या मार्गांवरील नेहमी वर्दळ राहते, हे काम निर्कृष्ट झाले आहे संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही कोण्ही अधिकारी व नगरसेवक लक्ष देत नाही.
जुन्या वस्तीत हा मुख्य मार्ग आहे कोरोना काळात रुग्णांना ये जा करण्यात गैरसोय निर्माण होत आहे. अंत्यविधी करिता लागणारा स्वर्ग रथ त्यांच्या घरापर्यंत पोहचू शकत नाही, तरी स्थानिक नागरिकांन मध्ये असंतोष निर्माण होत आहे संबंधित आधीकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी विक्रांत भगत सुहास जीवनकर सुनील कुंभारे अभय जीवनकर अमित जंगले अतुल मांडवे नामदेव वासेकर रवी मांडवे बाळू किटे पवन भगत सम्राट कांबळे चेतन भगत मिक्कू दुपारे पंकज वावरे किरण वडे आशिष जंगम आशिष निमसरकार अपूर्व नरंजे अमोल खौरकार सुभाष कांबळे कवडू खोब्रागडे विक्की मुनेशवर यांनी केली.