१० जुलै रोजीची अन्यायकारक अधिसूचना रद्द करा

0 104

२० टक्के अनुदान प्राप्त,अशा सर्व शाळांना प्रचलित नियमांनुसार अनुदान द्या…- शिक्षक प्रवीण दाभाडे

कन्नड,प्रतिनिधी  – १० जुलै २०२० रोजीची प्रचलित अनुदान व जुन्या पेंशन योजने संबंधीची अन्यायकारक अधिसूचना रद्द करण्यात यावी या साठी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित काशीनाथराव पाटील विद्यालय व शिक्षक भरती परिवार कन्नडच्या वतीने कन्नड येथे पंचायत समितीच्या शिक्षण विभागात आज शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा ताई गायकवाड यांच्या नवे निवेदन देण्यात आले, यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री विनोद पवार सर, सचिन भामरे, दीपक जाधव, सुनील पाटील, भगवान म्हैसमाळे, लक्ष्मण पांडव, सुनीता दापके, प्रवीण दाभाडे यांची उपस्थिती होती.

वडवणीतील जि.प.शिक्षकाच्या आयआयटीयन मुलाने करुन दाखवले

error: Content is protected !!