दहावीची मार्कशीट ‘या’ दिवशी मिळणार ; अकरावी प्रवेश प्रक्रिया अशी असणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दिलेल्या माहितीनुसार आज २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद काही वेळापूर्वी पार पडली. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार यंदा महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल हा ९३. ८० टक्के लागलेला आहे. बारावीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. राज्यात नऊ विभागांमध्ये पार पडलेल्या परीक्षेत कोकण विभागाने ९८. ११ टक्के निकालासह बाजी मारली आहे. तर मुंबई व पुणे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. सर्वात कमी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह नागपूर विभागाचा निकाल अत्यंत कमी लागलेला आहे.
दहावीची मार्कशीट कधी मिळणार?
महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनायलने दहावीच्या निकालानंतर मार्कशीट मिळण्याबाबत सुद्धा माहिती दिलेली आहे. यानुसार १४ जून ला शाळेत विद्यार्थ्यांना त्यांची मार्कशीट मिळवता येईल. तर आज निकाल जाहीर होताच आपण आपले गुण तपासून ऑनलाईन गुणपत्रिकेची प्रिंट आउट काढून घेऊ शकता. दुसरीकडे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात अगोदरच झालेली आहे. तरी निकाल लागल्यानंतर आपल्याला अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विविध प्रक्रियांचे वेळापत्रक कसे असेल हे पाहूया…
अकरावी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
१) दहावीची मार्कशीट (मूळ, व फोटोकॉपी)
२) आधार कार्ड, पॅनकार्ड (फोटोकॉपी)
३) पासपोर्ट साईज फोटो
४) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ व फोटोकॉपी)
५) रहिवासी पुरावा, घरचा पत्ता असलेला पुरावा (रेशनकार्ड, लाईट बिल)
६) जात प्रमाणपत्र (लागू होत असल्यास)
गरजेनुसार इतर काही कागदपत्रांची आवश्यकता भासू शकते.दरम्यान पूर्वी प्रमाणेच अल्पसंख्याक (५०%), इन-हाउस (१०%) आणि व्यवस्थापन (५%) यांसारख्या विविध कोट्यांतर्गत राखीव असलेल्या जागा विशेष फेरीत प्रथम भरल्या जातील. त्यानंतर प्रवेशाच्या तीन नियमित फेऱ्या होणार आहेत. त्यानंतर काही जागा रिक्त राहिल्यास त्या जागांचे दोन विशेष फेऱ्यांमध्ये कोणतेही आरक्षण न करता वाटप केले जाईल.