PM किसान योजनेच्या 15 वा हफ्ता होणार ‘या’ तारखेला जमा

0 171

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. अवघ्या 24 तासात शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी  योजनेचा 15 वा हफ्ता मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा पंधरावा हफ्ता उद्या म्हणजे 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पंतप्रधान किसान योजनेच्या 15 हफ्ता जमा होण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. देशभरातील शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्याकडे डोळे लावून बसले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

उद्या केंद्र सरकार 15 वा हप्ता जारी करणार आहे. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केलं नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केलं नसेल तर लगेच करुन घ्या.

पंतप्रधान मोदी आज आणि उद्या झारखंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी 7200 कोटी रुपयांच्या विविध योजनांची पायाभरणी करणार आहेत. त्यासोबतच अनेक योजनांचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी PM किसान योजनेचा 15 वा हप्ता म्हणून 18 हजार कोटी रुपये जारी करणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पीएम किसान योजनेचा 15 वा हफ्ता जमा होईल.

केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी खास योजना

पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आत्तापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे.

 

error: Content is protected !!