Corona Virus: चिंता वाढली! एकाच शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
नवी मुंबई – नवी मुंबईतील एकाच शाळेतील 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह (Covid Posititve) असल्याचं निदान झालंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं एकाच शाळेतील विद्यार्थ्यांना (Student) लागण झाल्याची माहिती समोर आल्यानं शाळेचं प्रशासनही हादरलंय. घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्था शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील (Shetkari Shikshan Sanstha School and Junior College, Ghansoli) हे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर नवी मुंबई महानगर पालिका (Navi Mumbai Municipal Corporation) सतर्क झाली आहे. पालिकेकडून विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या (Corona Test) करण्यात येत आहेत.
याच शाळेतील एका विद्यार्थ्याचे वडील कतारहून (Qatar) भारतात (India) परतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खबरदारी म्हणून या विद्यार्थ्याच्या संपूर्ण कुटुंबीयांची कोविड चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत परदेशातून परतलेल्या वडिलांची टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं चाचणीतून समोर आलंय.
घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्था शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडून संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. पालिका प्रशासनाने शुक्रवारी दिवसभरात 375 विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या. शनिवारी 600 विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत.
राज्यात कोरोनाचं संकट असताना कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने देखील शिरकाव केला आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona New Variant) ओमिक्रॉनमुळे (Omicron) राज्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या शंभरीपार झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे, एकट्या महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 40 रुग्ण आढळले आहेत. महत्वाचे म्हणजे ज्या रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे त्यामधील अनेकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. या रुग्णांपैकी अनेकांनी ओमिक्रॉनवर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी देखील सोडण्यात आले आहे.