श्री शिवाजी महाविद्यालयाच्या शिववाणी विशेषांकास तिसरे पारितोषिक
परभणी (२०) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट वार्षिक विशेषांकास पारितोषिक दिले जाते. यावर्षीचे तिसरे पारितोषिक ‘शिववाणी’ या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वार्षिक अंकास मिळाले आहे.
नांदेड येथे विद्यापीठाच्या सभागृहात बुधवारी (दि.१८) पार पडलेल्या कार्यक्रमात पारितोषिकाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य इंजि. नारायण चौधरी, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्या हस्ते संपादक डॉ.प्रल्हाद भोपे, विद्यार्थी संपादक वैभव शेटे, स्नेहा डहाळे, मयुरी शिंदे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे या पारितोषिकाचे स्वरूप होते. या अंकाच्या निर्मितीसाठी प्रा.रविशंकर झिंगरे,उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, डॉ.जयंत बोबडे,डॉ.तुकाराम फिसफिसे, प्रबंधक विजय मोरे, डॉ.उत्कर्ष किट्टेकर, प्रा.अतुल समिंद्रे आदींनी सदस्य म्हणून काम पाहिले. या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव,उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी,उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. उत्कर्ष किट्टेकर तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.