७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, ५३ जणांचा मृत्यू
तिबेट भागातील जिजांगमध्ये मंगळवारी सकाळी भूकंप झाला. येथे सकाळी ६.३० वाजता १० किमी खोलीवर ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर ७:०२ वाजता ४.७ रिश्टर स्केलचा, ७:०७ वाजता ४.९ रिश्टर स्केलचा आणि ७:१३ वाजता पाच रिश्टर स्केलचा भूकंप झाला.आज सकाळी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या भूकंपात किमान 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. 38 लोक जखमी झाले आहेत.
या भूकंपामुळे पश्चिम चीन आणि शेजारील नेपाळमध्ये कमीतकमी ५३ लोक ठार झाले असून, अनेक लोक यामध्ये अडकले आहेत. सिन्हुआ न्यूज एजन्सीनुसार, प्रादेशिक आपत्ती निवारण मुख्यालयाने दिलेल्या वृत्तानुसार, ६२ लोक जखमी झाले आहेत.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी अंदाजे १५०० बचाव कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने हा भूकं ७.१ रिश्टर स्कोल तीव्रतेचा असल्याचे नोंदवले आहे. तर, चीनने हा भूकंप ६.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, नेपाळसह उत्तर भारतातील अनेक राज्यांतही आज सकाळी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले होते. नेपाळमध्ये या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७.१ एवढी मोजण्यात आली. तर तिबेटमध्ये या भूकंपाची तीव्रता ६.८ एवढी मोजण्यात आली. भारतात बिहारमधील मोतिहारी आणि समस्तीपूरसह अनेक भागात सकाळी ६.४० वाजता अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. जवळपाच पाच सेकंदांपर्यंत भूकंपाचे हे झटके जाणवले. नेपाळमध्ये या भूकंपाची ही तीव्रता ७.१ एवढी मोजण्यात आली.