संतोष देशमुख हत्या प्रकरणात ७ आरोपींवर मकोका

0 28

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हतेप्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय. प्रतिक घुले, महेश सुदर्शन सांगळे, विष्णू चाटे याच्यासह सात आरोपींवर मोक्का (मकोका) लावण्यात आलाय. बीड पोलिसांनी सात आरोपींवर मोक्का लावलाय. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला नाही. वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेय.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हतेप्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय. प्रतिक घुले, महेश सुदर्शन सांगळे, विष्णू चाटे याच्यासह सात आरोपींवर मोक्का (मकोका) लावण्यात आलाय. बीड पोलिसांनी सात आरोपींवर मोक्का लावलाय. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला नाही. वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेय.

कोणत्या सात आरोपींवर मोक्का ?

सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे या आरोपींवर पोलिसांनी मोक्का लावला आहे. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही. तो खंडणीच्या आरोपात अटक आहे, पोलिस त्याचा तपास करत आहेत.

एक महिन्यात बीडमध्ये काय घडलं?

6 डिसेंबर
– संतोष देशमुखांचा मस्साजोग पवनचक्कीवर वाद
9 डिसेंबर
– सरपंच संतोष देशमुखांची हत्या
– धनंजय देशमुखांनी केली केजमध्ये तक्रार
– केज पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा
10 डिसेंबर
-बीडमध्ये सामान्यांचा रास्तारोको
-जयराम चाटे आणि महेश केदारला अटक
11 डिसेंबर
– क्राईम ब्रांचकडून प्रतिक घुलेला अटक
– वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा
13 डिसेंबर
– बीड जिल्हा बंदची हाक
– देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे
14 डिसेंबर
– केज पोलीस निरीक्षक महाजन सक्तीच्या रजेवर
– विष्णू चाटेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
18 डिसेंबर
– विष्णू चाटेला अटक
19 डिसेंबर
– देशमुखांच्या शवविच्छेदनात मारहाण झाल्याचं स्पष्ट
21 डिसेंबर
– पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांची बदली
– नवनीत कॉवत नवे पोलीस अधीक्षक
– शरद पवार,अजित दादांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट
24 डिसेंबर
– खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे
28 डिसेंबर
– जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा
31 डिसेंबर
– वाल्मिक कराड सीआयडीला शरण
3 जानेवारी
– डॉ. संभाजी वायबसे, सिद्धार्थ सोनावणेला घेतलं ताब्यात
4 जानेवारी
– सुधीर सांगळे, सुदर्शन घुलेला पुण्यातून अटक
6 जानेवारी
– शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
– धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीयांची राज्यपालांची भेट
7 जानेवारी
-देशमुख कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
-आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार

error: Content is protected !!