सोलार प्लांटवरील ८ हजार फूट तांब्याची तार लंपास
नारायण पाटील
सेलू,दि 10 ः
चोरट्यांनी तालुक्यातील वालूर- हातनूर रस्त्यावर असलेल्या दोन सोलार प्लांटच्या ८हजार फूट तांब्याच्या तारेची चोरी करत १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याची घटना ८ जानेवारी च्या रात्री घडली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे वालुर- हातनूर रस्त्यावर अशोक अण्णासाहेब काकडे यांच्या सोलार प्लांट वरील ३ हजार फूट तांब्याची तार किंमत ८० हजार रुपये तर याच परिसरात असलेल्या आर.बी. घोडके यांच्या सोलार प्लांट वरील ५हजार फूट तांब्याची तार किंमत १ लाख रुपये असा १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल आज्ञात चोरट्यांनी ८ जानेवारी रोजी रात्री दरम्यान चोरून नेल्याची घटना घडली आहे. गोविंद दत्तात्रय राऊत वय २४ वर्षे राहणार रवळगाव तालुका सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं११/२०२५ कलम ३०३ भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार हे पुढील तपास करत आहेत.