80 नग देशी दारू जप्त..
शंकरपूर पोलिसांची कारवाई..
शंकरपूर,प्रतिनिधी – येथून जवळच असलेल्या हिरापूर येथे दारू असल्याची गुप्त माहितीच्या आधारे मंगेश कांबळी यांच्या घरी धाड टाकत 80 नग देशी दारू( आठ हजाराची) दारू जप्त केली असून आरोपी शैलेश मनोहर कांबळी रहवासी हिरापूर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सदरची कारवाई शंकरपूर चौकीचे सपोनी विनोद जांभळे, यांच्या नेतृत्वाखाली सपो.हवा.सुधाकर लोहटकर, रंगराव खोबरागडे, अमित उरकुडे, परमेश्वर नागरगोजे, मंगेश बनसोड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.