गावठी दारू अड्यावर धाड; दोन हजार लिटर रसायन नष्ट

0 78

माजलगांव, प्रतिनिधी – तालुक्यातील तेलगाव खुर्द शिवारातील हातभट्टी अड्यावर माजलगांव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकला. यात दोन हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी दोघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल .

कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे लाकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद आहेत. अशावेळी बनावट गावठी दारू तयार करून काही समाजविघातक लोक त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी तालुक्यातील तेलगाव खुर्द शिवारात सिंदफणा नदीकाठी दारू तयार करत असल्याची माहिती माजलगाव ग्रामिण पोलिसांना मिळाली. यावर शुक्रवारी सकाळी १०.३० वा. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांच्यासह पोलीस नाईक मोरे, देशमुख, खराडे यांनी छापा मारला. याठिकाणी अंदाजे ६० हजार किंमतीचे दोन हजार लिटर रसायन, ५५ लिटर हातभट्टी दारू नष्ट करण्यात आले. मात्र आरोपींनी पळ काढला. याप्रकरणी माजलगांव ग्रामिण ठाण्यात सोमनाथ द्रोणाचार्य नरके यांच्या फिर्यादीवरून एकदरा येथील लाला रामचंद्र जाधव, दशरथ दयानंद जाधव रा. एकदरा यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

error: Content is protected !!