पोलिसांच्या कारवाईत गावठी दारुचे रसायन नष्ट

0 68

माजलगांव, प्रतिनिधी – तालुक्यातील लऊळ येथे अवैधरित्या गावठी दारू बनवली जात होती . याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळाल्यावरून सपोनि नीलेश विधाटे यांच्या पथकाने या अत्यावर कारवाई करत १ हजार ४०० लिटर रसायन , ७५ लिटर तयार दारु असे एकूण ४५ हजार ७५० रुपये मुद्देमाल जागीच नष्ट केला .
दि.२४ रोजी लऊळ नं . १ येथे गावठी दारू बनविली जात असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळाली . यावर ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश विधाटे पोलीस नाईक संदीप मोरे , पोलीस कॉन्स्टेबल अनिल आशेवाड यांनी आज सकाळी दहाच्या सुमारास त्याठिकाणी गेले असता आरोपी गणेश गायकवाड हे दारू तयार करत होता . यामध्ये एक हजार चारशे लिटर रसायन अंदाजे किंमत बेचाळीस हजार रुपये तसेच गावठी ७५ लिटर दारू त्याची किंमत ३७५० रु पये असा एकूण ४५ हजार ७५० रुपये मुद्देमाल जागीच नष्ट केला व आरोपी विरुद्ध पोलीस नाईक संदीप मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून , आरोपी फरार झाला आहे . आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत .

error: Content is protected !!