अक्षय्य तृतीयेचा नैवेद्य आमरसाविनाच; गावरान आंबे आलेच नसल्याने गुळवणी करण्याची वेळ

0 95

माजलगांव, धनंजय माने – निसर्गाचा लहरीपणा मागील काही वर्षांत जाणवू लागला आहे . दरवर्षी आंब्याच्या फळांनी लगडणारी गावरान आंब्याचे झाडे यावर्षी फळाविनाच आहेत . अनेक झाडाला आंबे लागले नसल्याने या वर्षी अक्षय्यतृतीयेलाही पुरणपोळीसोबत आमरसाच्या स्वादापासून मुकावे लागले . पित्रांनाही आमरसाविनाच नैवैद्य दाखवविण्याची वेळ नागरिकांवर आली .
बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगररांगेतवसखल भागात फार पूर्वीपासून आंब्याचे झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत . मकरसंक्रांत झाली की ही झाडे मोहराने लगडून जायची , गुढीपाडव्यापर्यंत मोठमोठ्या कैऱ्या तयारहोऊन अक्षय्यतृतीयेलास्वादिष्ट पिकलेली आंबे चाखायला मिळायची . अक्षय्यतृतीयेला पुरणपोळी सोबत आमरसाचा बेत अनेक घरांमध्ये ठरलेला असे . मात्र , गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आंबा उत्पादनावर झाला आहे . अनियमित पडणारा पाऊस आणि वातावरणात होणारे सततचे बदल यामुळे आंब्याच्या झाडांना फलधारणाच योग्य पद्धतीने होत नाही . या वर्षी गावरान आंब्याच्या झाडांना आंबे लागलेच नाहीत . त्यामुळे अक्षय्यतृतीयेला आंबा खायलाच काय तर पहायलासुद्धा मिळाला नाही . दरवर्षी अक्षय्यतृतीयेला पुरणपोळीचा बेत करणाऱ्या नागरिकांना या वर्षी गळवणीसोबत पुरणपोळी खावी लागली तर पित्रांनाही नैवैद्य आमरसाविनाच दाखवावा लागला . बाहेरचे आंबे मार्केटमध्ये आलेले आहेत . मात्र , लॉकडाऊन असल्याने ते विकत घेताही आले नाहीत .

जुनी झाडे चालली
वाळून गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जमिनीचा ओलावा कमी झाला आहे. मुळाद्वारे पाणी मिळत नसल्याने गावोगावी आंब्याची मोठमोठी झाडे वाळून गेली आहेत.

error: Content is protected !!