खासदार सुनिल तटकरे संचालित युवा प्रातिष्ठानच्या वतीने साई येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0 103

माणगांव, विश्वास गायकवाड – माणगाव तालुक्यातील साई ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या गावांना खा. सुनिल तटकरे संचालित युवा प्रतिष्ठानच्या वतीने गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत असल्यामूळे सर्वच ठिकाणी संचारबंदी व लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. या लॉक डाऊनमूळे अनेक व्यवसाय, उद्योग, नोकऱ्या, रोजंदारी कामे बंद झाली आहेत. त्यामूळे सतत मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता शासनाकडून, तसेच सामाजिक संस्था, समाजातील दानशूर व्यक्ती समाजातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करीत आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

या पार्श्वभूमीवर खा. सुनिल तटकरे यांच्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने साई परिसरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप २७ व २८ एप्रिल रोजी शासनाने दिलेल्या अटींचे पालन करुन साई ग्रामपंचायतीचे सरपंच हुसेनभाई रहाटविलकर, ग्रा.पं. सदस्य खेरटकर, जावेद अंबेरकर, हारुन सोलकर, काशिराम मोरे, प्रविण अधिकारी यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

error: Content is protected !!