आझाद नगरमध्ये गरजूंना धान्य वाटप
मुंबई – सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 3 मे पर्यंत राज्यात टाळे बंदी आहे. बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. हातावर पोट असणाऱ्या आणि लहान -सहान धंदे करणाऱ्या अनेकजणांना या कोरोनामुळे फटका बसल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येते.
समाजातील अशाच मध्यमवर्गीय -गोरगरीब घटकांना मदत करण्याचे आझादनगर मधील तरुणांनी मनावर घेतले.या सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी मुलुंड मतदारसंघातील भाजप आमदार मिहिरभाई कोटेचा यांच्या आमदारनिधीतून दि. 22 आणि 28 एप्रिल रोजी मुलुंडमध्ये धान्यवाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते . सदर कार्यक्रम आझाद नगर, मिठागर रोड, मुलुंड (पुर्व ), मुंबई याठिकाणी पार पडला. यावेळी विभागातील जवळपास 250 ते 300 गरजू लोकांनी या धान्यवाटप कार्यक्रमाचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्थानिक तरुण मंडळीने पुढाकार घेऊन योग्य रीतीने वाटप केले. याकामी श्री. अंकुश अबनावे, श्री मंगेश म्हात्रे, श्री सुभाष वाणी, श्री धनंजय गायकवाड, श्री.सोमनाथ खाडे यांनी खुप मेहनत घेतली. तसेच रामचंद्र मुदलियार, राजाराम गुप्ता, पंकज मिसाळ, दत्ता बोबडे, संजय हजारे या तरुणांचासुद्धा मोलाचा हातभार लागला.