लॉकडाऊन-3.0 घोषणा:4 मे ते 17 मे पर्यंत देशात लॉकडाऊन कायम
ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये सशर्त सवलत मिळू शकते
रेल्वे, विमान, शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, हॉटेल्स सर्वच झोनमध्ये बंद
दिल्ली – देशातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने दुसर्यांदा देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असून 4 मे ते 17 मे पर्यंत देशात लॉकडाऊन कायम राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या घोषणेप्रमाणे 3 मे पर्यंत लॉकडाऊनची मुदत आहे. आता पुन्हा लॉकडाऊनची मुदत दोन आठवड्यांनी वाढविण्यात आली आहे. देशव्यापी लॉकडाऊन 17 मे पर्यंत कायम राहणार आहे. याचबरोबर गृह मंत्रालयाने लॉकडाऊन दरम्यान रेड, ग्रीन आणि ऑरेज झोनमध्ये कोणत्या उपाययोजना हाती घ्याव्यात, याबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
पुणे जिल्ह्यातून गावी जाण्यासाठी १५ तहसील कार्यालयांप्रमाणे पाससाठी संपर्क क्रमांक व ई-मेल जाहीर
देशातील जवळपास 130 जिल्हे हे रेड झोन, 284 जिल्हे ऑरेंज, तर 319 जिल्हे ग्रीन झोन घोषित करण्यात आले आहे. या यादीत महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना संसर्गाच्या हॉटस्पॉट जिल्ह्यांच्या श्रेणीत समाविष्ठ करण्यात आले आहे. 65 वर्षे वयावरील नागरिकांना घराबाहेर पडू दिले जाणार नाही. गर्भवती महिलांनाही घराबाहेर पडण्यास मनाई कायम आहे.
खुशखबर! राज्य सरकारने गावी जाण्यासाठी गाईडलाईन केल्या जाहीर; असा करा पाससाठी अर्ज
रेड झोन (हॉटस्पॉट क्षेत्र) सवलत नाही
कोरोनाच्या हॉटस्पॉट क्षेत्रात कोणतीही सवलत दिली जाणार नाही. या भागात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. तसेच, कोणालाही बाहेर पडू दिले जाणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची होम डिलीव्हरी केली जाईल. त्या भागाच्या सुरक्षा क्षेत्रात व्यस्त असलेले कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचार्यांना फक्त परवानगी राहिल.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत, त्यांना सवलत मिळू शकते. नियमितपणे या भागांचा आढावा घेवून काही भागात थोडी सवलत दिली जाईल. सवलत देण्यापूर्वी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वाचे अनुसरण करण्यासाठी सर्व उपाय केले जातील, जेणेकरून कार्यालय, कार्यस्थळ, कारखाने किंवा संस्थांमध्ये सामाजिक अंतर कायम ठेवले जाईल.
राज्यात रेड झोनमध्ये 14 जिल्हे
मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, सातारा, पालघर, पुणे, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नाशिक, अकोला, यवतमाळ
ऑरेंज झोनमध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश
रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, रायगड, अहमदनगर, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, परभणी, नंदूरबार
राज्यात 6 असे जिल्हे ग्रीन झोनमध्ये
सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, गोंदिया, वाशिम, वर्धा, गडचिरोली