विधीज्ञ मंच पुणे आयोजित वकिलांसाठी निबंध लेखन स्पर्धा
पुणे – कोविड-१९ मुळे राज्यासह देशभरात लाॅकडाऊन सुरु आहे. नुकतेच लाॅकडाऊन ३.० सुरु झाले असून ते २ आठवड्यांसाठी वाढवून ४ मे ते १७ मे असे करण्यात आले आहे. घरात बसून प्रत्येकाला कंटाळा येत आहे. त्यातच आपापल्या विरंगुळ्यासाठी प्रत्येकजण काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच अँड. अतुल पाटील यांच्या पुढाकाराने विधीज्ञ मंच पुणेच्या वतीने वकिलांसाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील निबंधासाठीचे विषय
१) मानवाधिकार आणि भारतीय न्यायालये
२) भारतीय न्यायव्यवस्थेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर
३) वकिली व्यवसाय आणि वकिलांच्या बार कौन्सिल कडुन असणाऱ्या अपेक्षा या पैकी कोणताही एक
सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला https://forms.gle/euvbKtM5qRdXr9ej9 या लिंकचा वापरकरुन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच स्पर्धकाचा निबंध हा स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. अन्यथा नोंदणी नसणाऱ्या उमेदवारांचे निबंध बाद ठरवले जातील.
विधीज्ञ मंच आयोजित फक्त वकिलांसाठीच्या निबंध स्पर्धेचे नियम
१) स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व बंधु आणि भगिनींसाठी खुली आहे
२) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही
३) निबंध हा A4 साईज मधे मराठी किंवा इंग्रजी भाषेमधे जास्तीत जास्त ४ पाने टाईप केलेला असावा किंवा स्वच्छ व वाचनीय अक्षरात हाताने लिहलेल्या निबंधाचे scan image पाठवता यईल.
४) आपला निबंध pdf file/image स्वरुपात खालील email वर पाठवावा : vidhidnyamanch@gmail.com
५) स्पर्धेसाठी निबंध पाठवण्याचा अंतिम दिनांक : १० मे २०२०
६) स्पर्धेचा निकाल जाहीर होण्याचा दिनांक : २५ मे २०२०
७) प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु ५००१,रु ३००१ व रु १००१ रोख,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाईल.
८) प्रत्येक सहभागी वकिलांना प्रमाणपत्र मिळेल.
९) निबंध लिहिताना स्पर्धकांनी कोणत्याही प्रकारचे copyright चे उल्लंघन करु नये.
१०) सहभागी स्पर्धकांचे निबंध प्रकाशित करण्याचा आयोजकांना आधिकार राहील.
११) अंतिम निवड महाराष्ट्रातील ज्येष्ठ व नामांकित वकिल करणार आहेत.
१२) परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
या स्पर्धेच्या आधिक माहिती साठी खालील व्यक्तींना संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने अँड. अतुल पाटील यांनी केले आहे.
अँड.योगेश पवार – ९४२२०००७२४
अँड.अतुल पाटील (उच्च न्यायालय,मुंबई) – ९९६०१९१७३३
अँड.सचिन हिंगणेकर – ९८९०८९८५८५
अँड.गणेश लोळगे – ९८५०७१९०६९
अँड.विश्वास खराबे – ९८६००७०९०११
याविषयी विचारले असता वकिलांचे विचार प्रगल्भ व्हावेत, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, स्पर्धेच्या अनुषंगाने त्यांचा अभ्यास व्हावा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून लाॅकडाऊन मधील त्यांचा वेळ सत्कारणी लागावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे अँड.अतुल पाटील (उच्च न्यायालय,मुंबई) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
या स्पर्धेसाठी www.lawremedies.in यांचे सौजन्य लाभले आहे.