तळीरामांसाठी खुशखबर… येथे करा अर्ज; घरपोच मिळेल मद्य
परभणी, प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी परभणी जिल्ह्यात मद्य खरेदीसाठी होणा-या गर्दीचे नियमन होण्यासाठी मद्य खरेदी करु इच्छीणा-या नागरीकांची नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
https://forms.gle/sFSw7NrgtYY62kHMA
१. या प्रणालीत मद्य खरेदी करण्यास इच्छुकांनी स्व्त:चे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता भरावयाचा आहे.
२. परवाना धारकांनी परवान्याची फोटो कॉपी आणि परवाना नसेल तर इतर कोणतेही ओळखपत्र अपलोड करावयाचे आहे.
३. या व्यतीरीक्त प्रत्येक खरेदी करणार्यांनी आपले स्वत:चे छायाचीत्र अपलोड करावयाचे आहे.
४. त्याच बरोबर प्रत्येक मागणी नोंदवीतांना आपल्या भागातील मद्य विक्रेता निवडावयाचा आहे.
५. मागणी करण्याचा मद्य प्रकार आणि युनिटची संख्या नमुद करणे आवश्यक आहे.
६. मद्य खरेदीची नोंदणी केल्यानंतर मद्य विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या स्टॉक नुसार ऑर्डर पुर्ण होईल.
७. मद्य खरेदीसाठी परवाना असणे आवश्यक आहे. परवाना नसेल तर खरेदीपुर्वी मद्य विक्रेत्याकडून एक दिवसीय मद्यसेवन परवाना उप्लब्ध करून घ्यावा.
८. सदर मागणी दिनांक १७ मे २०२० रोजी सायकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात येईल.
९. विदेशी मदयाबाबतीत घरपोच सेवा आवश्यक असल्यास तसे नमुद करावे. घरपोच मदयसेवा फक्त विदेशी मदय पुरविण्यात येईल.
मद्य खरेदीची मागणी संकलीत झाल्यानंतर अर्जांची छाननी करून परभणी जिल्हातील मद्यविक्रेत्यांच्या नावानुसार वर्गवारी करण्यात येईल आणि ज्या क्रमाने अर्ज केले आहेत त्या क्रमाने वेळापत्रक आखुन देण्यात येईल. संबंधीत खरेदीदारास त्यांनी नोंदवीलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांना नेमुन दिलेला दिनांक कळविण्यात येईल.