Breaking News – परभणी जिल्ह्यातील जिंतूरमध्ये संचारबंदी लागू
परभणी प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातील शेवडी गावात 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी परभणी यांनी शेवडी हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसेच जिंतूर नगरपरिषद हद्द आणि 3 किमी. परिसरामध्ये दि. 14 मे 2020 च्या मध्यरात्रीपासून ते दि. 16 मे 2020 चे 24 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
केवळ यांना मिळणार सवलत – या संचारबंदीतून खालील व्यक्ती व समूहांना सूट राहणार आहे.
– सर्व शासकीय कार्यालये / त्यांचे कर्मचारी / त्यांचे वाहने / सर्व शासकीय वाहने
– सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने
– शासकीय निवारागृहे / कॅम्पमध्ये तसेच बेघर व गरजुंना अन्न वाटप करणारे सेवाभावी संस्था व त्यांची वाहने
– अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती
– वैद्यकीय आपात्काल व अत्यावश्यक सेवा
– पेट्रोल पंप वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने
– प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक
– गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी
– दुध विक्रेते (गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जावून सकाळी 6 ते 9 या कालावधीत विक्री करावी. एका ठिकाणी थांबून विक्री करता येणार नाही.)
– खत वाहतूक त्यांचे गोदामे/दुकाने, त्याच्यासाठी लागणारी वाहने व कामगार.
– राष्ट्रीयीकृत बँका केवळ रास्तभाव दुकानदार यांचेकडून चलनाव्दारे पैसे भरणा करून घेणे या बाबीकरिता.
याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती/वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.