‘त्या’ तिघींचे होत आहे सर्वत्र कौतुक; मालेगाव येथे कोरोनाच्या लढ्यात बजावली महत्वाची भूमिका
मनमाड, प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्यात हॉट-स्पॉट ठरलेले मालेगाव शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.अशा महाभयंकर साथीच्या आजारात मनमाड येथील तीन मुलींनी रुग्णांची सेवा करून संचारबंदी काळात घरोघरी जाऊन सर्व करण्याचे काम केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून त्यांचा सत्कार मनमाड शहराच्या वतीने करण्यात आला आहे यावेळी अनेकांनी त्यांच्या या सेवेचे आणि कार्याचे तोंडभरून कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कोरोना सारख्या जागतिक महामारीने थैमान घातले असून नाशिक जिल्ह्यात मालेगाव शहर हे कॉरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यात मनमाडच्या वेशिवर असलेल्या मनमाड येथील नर्स माधुरी त्रिभुवन, विजया त्रिभुवन, वर्षा जाधव गेल्या दीड महिन्यापासून मालेगाव येथे आपली सेवा बजावत आहे. रुग्णाच्या घरोघरी जाऊन सर्व्ह करणे त्यांना होमकोरंटाईन करणे आणि कोरोना रुग्णाची सेवा करणे आदि कामे हे आपल्या जीवाची पर्वा न करता इमानेइतबारे करत होत्या. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागले पण या योध्यानी हार न मानता मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानुन आपले काम चालू ठेवले. आपल्या कुटुंबा पासून काही आपल्या लहान मुलाला पासून लांब आहे या सर्व नर्सचे गेल्या दीड महिन्यानंतर आपल्या घरी आगमन झाले अश्या या कोरोना योध्याचे मनमाडकारण कडून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.शिवसेना गटनेते गणेशभाऊ धात्रक यांनी स्वतः फोन करून कोरोना योध्याचे अभिनंदन आणि आभार मानले.
हे ही वाचा – आनंदाची बातमी… दिड महिन्याचे बाळ व ४ वर्षाच्या मुलाने केली कोरोनावर मात
हे ही वाचा – लाॅकडाऊन 4.0 : महाराष्ट्रात काय राहणार सुरु आणि काय बंद जाणून घ्या !
लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…