दिवाळीनंतर करू; पण थाटामाटातच नववधू-वरांनी रेशीमगाठी बांधण्याचा मुहूर्त ढकलला पुढे
माजलगांव, धनंजय माने – आयुष्याला वळण देणारा लग्नाचा क्षण थाटामाटात साजरा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जोडप्यांनी साखरपुडा उरकून घेतला . लग्नसराईतल्या तिथीही काढून ठेवल्या , पत्रिकाही छापल्या ; परंतु परंतु कोरोनाच्या संकटामुळे स्वप्नच भंगले . पाच , सहा महिन्यांत परिस्थिती सुधारेल अशी आशा बाळगून अनेकांनी रेशीमगाठी बांधण्याचा मुहूर्त पुढे ढकलत दिवाळीनंतर करू ; पण थाटामाटातच करण्याचा चंग वधू नववधू – वरांचे वरांनी बांधला आहे .
दिवाळीतील तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्ताना सुरवात होत असली , तरी उन्हाळ्यातील मार्च ते जून महिन्यात मोठ्याप्रमाणात लग्नसराईचा सिझन असतो . उन्हाळ्यात होणाऱ्या लग्नाची तयारी जानेवारी महिन्यापासूनच करायला सुरवात होते . यावर्षी लग्नाचे मुहूर्त कमी असल्याने मार्च , मे महिन्यात अनेकांनी लग्नाचा मुहूर्त काढला होता . आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण साठवून ठेवण्यासाठी थाटामाटात लग्न करण्यासाठी तयारी सुरू केली होती . आयुष्यभर आठवणींना उजाळा देणारा क्षण मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी घरच्यांनी हट्ट करूनही छोटेखाणी , साखरपुड्यातील लग्नाला अनेक नववधू – वरांनी विरोध केला . अनेकांचा साखरपुडा झाला , लग्नाचे मुहूर्त निघाला , पत्रिका वाटप झाल्या , लग्नाचे स्वप्न रंगवायला सुरवात झाली अन् देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउन घोषित झाला . संपूर्ण देश ठप्प झाला , मंगलकार्यालयांना लग्न रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या , सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले अन् अनेक नववधू वरांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले . केवळ दहा माणसांच्या उपस्थितीत लग्न करायला प्रशासनाकडून परवानगी देण्यात येऊ लागली . यामुळे आता काय करायचे , असा प्रश्न निर्माण झाला . दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालल्याने अनेकांनी छोटेखाणीच लग्नाला पसंती दिली अन् घरच्या घरीच लग्नाचा विधी उरकून घेतला . काहींनी मंदिरात , काहींनी घरात , तर अनेकांनी शेतातच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न लावून घेऊन स्वप्नांना मुरड घातली . असे असले तरी अनेकांनी मात्र थाटामाटातच लग्नाचा हट्ट कायम ठेवला आहे .
सध्या कोरोनाची परिस्थितीत नाजूक असली , तरी येत्या पाच , सहा महिन्यांत ती नक्कीच सुधारेल . त्यानंतर मात्र सर्वकाही पूर्वीप्रमाणेच सुरळीत होण्याची आशा बाळगून दिवाळीनंतर करू ; पण थाटामाटातच करू असा चंग बांधून रेशीमगाठीचा मुहूर्त पुढे ढकलला आहे .
कोरोनाचे संकट हे देशावरचे संकट असल्याने कायद्याचे पालन करणे सर्वांना बंधनकारकच आहे . ३१ मार्चला लग्नाचा मुहूर्त ठरला होता ; परंतु लॉकडाउनमुळे लग्न करता आले नाही . पाच , सहा महिन्यांत परिस्थिती सुधारण्याची आशा असल्याने आता दिवाळीनंतर लग्न करण्याचे दोन्ही कुटुंबांनी ठरवले आहे .
-राणी वाघमारे , भावी वधू