शेळवेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबीर संपन्न
पंढरपूर – देशासह राज्यात व सोलापूर जिल्ह्यात कोरोना( Covid-19) या महामारीने धुमाकूळ घातला आहे. सुरवातीला जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण नव्हते मात्र मागच्या काही दिवसांपासून झपाट्याने रुग्णांची वाढ होत आहे तरी या रुग्णांना रक्ताचा तुटवडा होऊ नये या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्याला आव्हानाला साथ देत पंढरपूर तालुक्यातील शेळवे गावात सोशल डिस्टनसिंग च्या नियमांचे पालन करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी गावातील ५२ युवकांनी व ग्रामस्थांनी साथ देत कर्तव्य समजून रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे , आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, रक्त पेढी, ग्रामस्थ , ग्रामपंचायत प्रशासन या सर्वांचे मनःपूर्वक आभार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अरुण आसबे यांनी मानले. या वेळी माणिकराव गाजरे, अण्णासाहेब गाजरे, विठ्ठल गाजरे, राहुल गाजरे, सतीश चव्हाण, निलेश आसबे यांसह इतर मान्यवर ऊपस्थित होते .