दुसऱ्या जिल्हयातून आलेल्या व्यक्तींची माहिती लपवली तर गुन्हा दाखल करण्यात येईल- शोभा ठाकूर

0 140

माजलगांंव, प्रतिनिधी – कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी मागील दोन महिन्यांच्या कालावधीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माजलगांंव उपविभागातील नागरिक लॉकडाऊनचे नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. याचा विपरीत परिणाम म्हणून काल – परवा पर्यंत माजलगांव उपविभागामध्ये बाधित रुग्ण सापडलेला नव्हता . दुसऱ्या जिल्हयात अडकलेल्या मजूर , यात्रेकरू , यांचेसह इतर नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना आरोग्य तपासणीसह काही अटींवर आपल्या जिल्हयामध्ये स्वत : चे गावी येण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे . असे असतानाही विनापरवानगी तसेच छुप्या मार्गाने दुसरा जिल्हा , बाहेरगावाहून स्वत : च्या मुळ गावी परत येऊन लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करत आहेत . तसेच काही नागरीक त्यांना याकामी सहकार्य करत आहेत.अशा व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासना द्यावी आणि हि माहिती लपवली तर संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा माजलगांंव च्या उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर यांनी दिला आहे. कारण सदर व्यक्तींची माहिती लपवल्याने त्यांचे संपुर्ण कुटूंब तसेच सदर गावाचे आरोग्य धोक्यामध्ये पडते. यावरुनच माजलगांंव उपविभागातील हिवरा , कवडगावथडी या गावामध्ये आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांवरुन याचीच प्रचिती येते ज्यामुळे सदर गाव व परिसरातील अनेक गावांमध्ये याचा संसर्ग होण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला . म्हणून बाबींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनासोबतच माजलगांंव उपविभागातील माजलगांंव , धारूर , वडवणी या तिन्ही तालुक्यातील ग्राम दक्षता समित्यांनी अत्यंत दक्ष राहणे गरजेचे आहे . बाधित भागातून तसेच दुसऱ्या जिल्हयातून विनापरवानगी आलेले तसेच परवानगी घेऊन आलेले मात्र वारंटाईन नियमांचा भंग करुन गावात , शहरात इतर फिरणाऱ्यां व्यक्तीं बाबतची माहिती नागरिकांनी तात्काळ प्रशासनास , ग्राम दक्षता समिती , ग्राम सुरक्षा दल , ग्रामसेवक , तलाठी , मंडळ अधिकारी , सरपंच , पोलिस पाटील , आरोग्य कर्मचारी , आशा स्वयंसेविका यांना द्यावी. तसेच ग्राम दक्षता समिती व ग्राम सुरक्षा दल यांनी गावात राहून कोण कोण व्यक्ती गावात आलेल्या आहेत याबाबत सतर्क रहावे.असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.

error: Content is protected !!