वडवणीतही आढळला कोरोना पॉझिटीव्ह

0 87

वडवणी, प्रतिनिधी – वडवणी तालुक्यात पहिल्यांदाच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे . येथील साळींबा रोडवरील आण्णाभाऊ साठे चौकात राहणारा ६७ वर्षीय पुरुष मुंबईहून आलेला होता . तो रुग्णआल्यापासून क्वारंटाईन होता . माजलगांव तालुक्यातील कवडगाव थडी येथे दोन रुग्ण पॉझिटीव्ह आढळून येताच त्यांच्या संपर्कातील इतरांनाही क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले होते . दोन दिवसांपुर्वीच वडवणीच्या या रुग्णाला जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते . तो आणखी जास्त कोणाच्या संपर्कात येण्यापुर्वीच आरोग्य प्रशासनाने त्याला आपल्या ताब्यात घेतलेले होते . ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी मधुकर घुबडे यांनी दिली .

आतापर्यंतची आकडेवारी
• पिंपळा १
• इटकूर २
• हिवरा १
• कवडगाव थडी २
• बीड ५
• चंदन सावरगाव १
• केळगाव १
• वडवणी १ • पाटोदा १
• वाहली चिखली
• एकूण १७- अॅक्टीव्ह रुग्ण १६
• बरे झालेले रुग्ण १ ( पिंपळा ता.आष्टी ) • पाटण सांगवीत आढळलेल्या ७ रुग्णांची नोंद बीड जिल्ह्यातून काढून टाकण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली .



error: Content is protected !!