क्वारंटाईनच्या नावाखाली गावागावात राजकारण; गरीब शाळेत तर श्रीमंत घरी
माजलगांव, प्रतिनिधी – जिल्या बाहेरून खेड्यात आलेल्या लोकांमध्येही कारंटाईनच्या नावाखाली राजकारण सुरू झाल्याने श्रीमंत घरी तर गोरगरीबच शाळेत असा प्रकार चालू असल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने यावर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कलम १४४ लागू करून संचारबंदी व लॉकडावून आदेश जारी केले. त्यामुळे शहरातील लहान मोठे व्यवसाय बंद करण्यात आले असल्याने शहरात राहणा – या कामगारांवर उपासमारीची पाळी आली होती. त्यामुळे सरकारने बाहेर जिल्ह्यात राहणा – या कामगारांना आपआपल्या गावी जाण्याची परवानगी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शहरातील विविध कारखाने बंद झाली. त्यामुळे येथील मजुर वर्गाला काम नसल्याने हे सर्व अनेक शहरात अडकून पडले होते. परंतु शासनाची परवानगी मिळताच मोठ्या प्रमाणावर लोक खेड्याकडे परतले काही परतत आहेत. मात्र आता बाहेर जिल्हयातील लोकांमुळे गावात भीतिचे वातावरण खेड्यात गावकऱ्यामध्ये निर्माण झाले आहे. नुकतेच माजलगांव तालुक्यात मुबंई वरून आलेले हिवरा आणि डुब्बाथंडी येथेल कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत त्यामुळे बाजूची चार किमी चे गावे अनिःचित काळा साठी प्रशासनाने बंद केली आहेत एकीकडे शासनाने बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांना वारंटाईन करण्यासाठी स्थानिक पातळीवर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, आरोग्य सेवक, मुख्याध्यापक, पो.पाटील यांना अधिकार देवून जि. प. शाळेत व्यवस्था करुन क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले.
मात्र गावात क्वारंटाईनच्या नावाखाली राजकारण सुरू झाल्याने हे सत्ताधारी बाहेर जिल्ह्यातून आलेल्या काही गोरगरिबांना आपला धाक दाखवून जि.प. शाळेत कारंटाईन केल्या जात आहेत . मात्र काही जवळील श्रीमंत गाव पुढारी यांचे रेडझोन मधून आलेले नातेवाईक हे लोक राजरोस पणे घरातच कुंटुंबांतच राहतात आणि गावात गावकऱ्यांमध्ये वावरात. अशा या लोकामुळे गावकऱ्यांना कोरोना संसर्गाची लागण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
गावातील सत्ताधारी क्वारंटाईनच्या नावाखाली काही लोकांमध्ये दुजाभाव करीत असल्याने गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.या आलेल्या लोकांना रुग्णालयात चेकअप करुन शाळेत क्वारं टाईन करण्याची मागणी गावागावात होऊ लागली आहे.