चालू होणाऱ्या जिनींग बंदच; नेत्यांची मात्र श्रेयासाठी चढाओढ
आ. सोळंके, आडसकरांनी शेतकऱ्यांना झुलवले; बुधवारी एकही नवीन जिनींग चालू झाली नाही
माजलगांव, प्रतिनिधी – लॉकडाऊनमुळे दोन महिन्यापासून शेतकन्यांचा कापूस घरात पडून राहिल्याने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. पंधरा दिवसांपूर्वी शासनाने कापूस खरेदीला सुरुवात केली, परंतु तालुक्यात एकच जिनिंग आणि त्यावर फक्त ५० शेतकऱ्यांचेच मापे होऊ लागली.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कापसाच्या खरेदीसाठी आम्ही प्रयत्न केल्याचे सांगून बुधवारपासून मतदारसंघात ६ जिनिंग मुरु होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून आमदार प्रकाश सोळंके, भाजपचे रमेश आडसाकारांनी शेतकऱ्यांना आशेला लावले, परंतु बुधवारी प्रत्यक्षात एकही जिनिंग चालू झालीच नाही. यामुळे नेत्यांचा हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे उघड झाले आहे. दोन महिन्यापूर्वी देशावर कोरोनाचे संकट आल्याने पंतप्रधानांनी संपूर्ण देश लॉकडाऊन घोषित केला. यापूर्वीच शेतकन्यांच्या कापसाची शेवटची वेचणी होऊन संपूर्ण कापूस घरात आला होता. भाववादीच्या आशेने आणि
एकदाच संपूर्ण कापूस विक्री करण्याच्या विचाराने अनेक शेतकऱ्यांनी सर्व कापूस घरातच साठवून ठेवला होता. एवढ्यात लॉकडाऊन घोषित झाल्याने घरात साठवून ठेवलेला संपूर्ण कापूस विक्री अभावी घरातच पडून राहिला आहे. पंधरा दिवसापूर्वी शासनाने कापूस खरेदीसाठी काहीअंशी सूट देऊन कापूस खरेदी सुरु केली होती. सुरवातीला एकाच जिनिंगवर दररोज के वळ २० शेतकऱ्यांना परवानगी दिल्याने धीम्यागतीने खरेदी सुरु होती. माजलगाव तालुक्यात कापूस विक्री करणाऱ्या ४ हजार २०० शेतकन्यांची नोंद बाजार समितीकडे नोंदविण्यात आली आहे. दररोज केवळ २० शेतकऱ्यांचीच मापे होऊ लागल्याने मोठा उशीर होत असल्याने पुन्हा शासनाने यात आणखी ३० शेतकऱ्यांची वाढ करत दररोज ५० शेतकऱ्यांना परवानगी देण्याचे आदेश काढले होते. पावसाळा तोंडावर आल्याने खरीप पेरणीची तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे उपलब्ध नाहीत. घरात पडलेल्या कापसाचीही विक्री होत नसल्याने पेरणीच्या पैस्याची चिंता लागली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मतदारसंघातील दोन दिग्गज नेते पुढे सरसावले अन त्यांनी प्रशासनाला निवेदान देऊन पावसाळ्यापूर्वी सर्व कापसाची खरेदी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चार दिवसापूर्वी दोन्ही नेत्यांनी माध्यमांना बातम्या देऊन बुधवारी पासून मतदारसंघातील सहा नवीन जिनिंग सुरु होणार असून लवकरच शेतकऱ्यांच्या सर्व कापसाची खरेदी करण्यात येणार असल्याचे आमदार सोळंके, रमेश अडसाकर यांनी सांगितले होते. बुधवारी रोजी मात्र प्रत्यक्षात पूर्वीचीच एकाच जिनिंग खरेदी सुरु होती. नवीन एकही जिनिंग चालू झाली नाही. नेत्यांनी दिलेल्या बात्म्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची तयारी केली होती; परंतु नेत्यांची आश्वासने फुसका बार ठरल्याने भ्रमनिरास झाला आहे. माध्यमांना बातम्या देऊन श्रेय घाण्याचाच नेत्यांचा हा स्टंट तर नव्हताना असा निर्माण होत आहे.
ट्रेनिंग घेऊन आलेले प्रेडर यांना जिल्हा प्रशासनाने कारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी जिनिंग सुरु होऊ शकल्या नाहीत.
-प्रकाश सोळंके, आमदार माजलगांव
ग्रेडर रेड झोनमधून आल्याने त्यांना तत्काळ जिनिंगवर पाठवणे योग्य नसल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे जिनिंग सुरु झाल्या नाहीत. दोन दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलन करणार आहे.
-रमेश आडसकर, भाजप नेते
नवीन जिनिंग सुरु करण्याबाबत आजपर्यंत शासनाचे कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे बुधवारी केवळ एक जिनिंग सुरु ठेवण्यात आली. -हरिभाऊ सवने, सचिव