शेतमाल थेट विक्रीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत
वैजापूर प्रतिनिधी, विलास म्हस्के – शेतकऱ्यांना आता आपल्या शेतात पिकवलेला शेतमाल देशात कुठेही विकता येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने द फार्मिंग प्रोडयुस ट्रेड अँड फार्मर्स अध्यादेश फार्मर्स एग्रीमेंट ऑन प्राईस अॅशुरन्स अँड फार्मर सर्विसेस अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तथा वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी तज्ञ संचालक संतोष सुर्यवंशी यांनी स्वागत केले आहे.
या अध्यादेशामुळे आता कृषी उत्पादनांच्या व्यापारात कोणतीही अडचण येणार नाही. शेतकरी सहजपणे हा व्यापार करू शकतील या निर्णयामुळे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत आपला शेतमाल विकण्याच्या बंधनापासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. यामुळे शेतकरी आता आपला शेतमाल ते बाजारपेठ कोणीही मध्यस्ती राहणार नाही. या शिवाय शेतकरी आपला कृषी उत्पन्न उत्पादनावर स्वतः प्रक्रिया करू शकतील. याची खरेदी विक्री व निर्यात देखील इतर व्यापाऱ्यांच्या बरोबरीने करू शकतील. या अध्यादेशाचा बरोबरच जीवनावश्यक वस्तू अधिनियम दुरुस्तीला देखील मान्यता देण्यात आली असून कांदा, दाळी, बटाटा जीवनावश्यक वस्तूमधून वगळल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कृषी मालाला विशेष करून कांदा पिकाला अनेकदा चांगला भाव मिळत नव्हता. जीवनावश्यक वस्तू मध्ये कांद्याचा समावेश असल्याने देशात कांद्याचा तुटवडा होउ नये म्हणून अनेकदा निर्यात बंदी केली जायची. तसेच भावही कमी मिळायचा शेतकऱ्यांसाठी एक देश एक बाजार धोरण राबविण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असून या निर्णयाचा आम्ही सर्व शेतकरी स्वागत करतो. राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना मारक अशा शासन निर्णयात बदल करावा.
-संतोष सुर्यवंशी
शासन नियुक्त तज्ञ संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर