सत्यवान -सावित्रीची आठवण करीत वट पौर्णिमा साजरी

0 88

जन्मो -जन्मी आहे तोच पती रहावा अशी प्रार्थना करीत भगवान शंकराचे प्रतीक असलेल्या वडाच्या फांदीला धागा बांधून सात फेरे मारून एक दुसऱ्याची ओटी भरून वडाच्या फांदीची पूजा

वैजापूर,विलास म्हस्के -शुक्रवार(ता,०५)रोजी वैजापुरात सुवासिनींनी वट पौर्णिमा उत्सव साजरा केला,कोरोना मुळे तोंडावर मास्क लावून,व शारीरिक अंतर सुद्धा पाळण्यात आले.

शहरात बऱ्याच ठिकाणी खुल्या जागेत व काही मंदिरात वडाचे वृक्ष आहेत परंतु या ठिकाणी जाऊन पूजा करण्यास मनाई करण्यात आली होती,म्हणून सुवासिनींनी घरात,किंवा दारासमोर वडाच्या झाडाची फांदी मागवून पारंपरिक पद्धतीने पूजा करून, सावित्रीच्या व्रताचे पालन केले, देशपांडे गल्ली त वडाची फांदी आणून पूजा करण्यात आली यात प्रामुख्याने सौ,संगीता राजपूत,सौ,शीतल राजपुत, सौ,मयुरी राजपूत,सौ,पल्लवी राजपूत ,यांनी पुढाकार घेऊन मोहल्यातील महिलांना पूजेची संधी उपलब्ध करून दिली, त्यांना चेतन राजपूत,सामाजिक कार्यकर्ता धोंडिरामसिंह राजपूत,ऍड ,डी,के,राजपूत यांनी सहकार्य केले,तसेच नुपूर राजपूत,श्रीमती जोत्सना राजपूत , शौर्य राजपूत,रिशान राजपूत,रिदान
राजपूत यांनी ही सहकार्य केले,शहराच्या विविध भागात सकाळपासून  दोन-चार महिलांनी प्रशासनाचे
नियम पाळत  वट पौर्णिमा साजरी केली, या समयी कोरोना व्हायरस मुळे प्रथमच  चेहऱ्यावर मास्क लावून वड वृक्ष पूजा करण्याची वेळ सुवासिनींनवर आली अशी प्रतिक्रिया साठ वर्ष वयाच्या श्रीमती जोत्सना राजपूत यांनी  दिली,तर पासष्ट वर्ष वयाच्या श्रीमती लता बाई म्हणाल्या की यापूर्वी आम्ही फांदीची पूजा कधीच केली नाही.

वडाच्या फांदीची पूजा करताना-सौ ,संगीता राजपूत,सौ ,शीतल राजपूत,सौ,पल्लवी राजपूत,सौ, मयुरी राजपूत

जागतीक पर्यावरण दिना निमित्त हरिपाठातून होणार विद्यार्थ्यांचे प्रबौधन

script async src=https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js/script

ins class=adsbygoogle

style=display:block

data-ad-format=autorelaxed

data-ad-client=ca-pub-1232538928057048

data-ad-slot=9070704187/ins

script

(adsbygoogle = window.adsbygoogle && ).push();

/script

error: Content is protected !!