बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे पाणी का गुलाबी झाले ? वाचा लोणार सरोवरातील पाणी गुलाबी होण्यामागे शास्त्रीय कारण
बुलडाणा – जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे (lonar sarovar) पाणी अचानक गुलाबी झाले आणि लोणार मधील हजारो नागरिकांनी सरोवराचे हे गुलाबी रुप पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर याबाबत अनेकांच्या मनात कुतुहुलसुद्धा निर्माण झाले.
दरम्यान तहसीलदार सैदन नदाफ यांनी सरोवराला भेट देऊन पाहणी केली.पाण्याने रंग कशामुळे बदलला, याचे संशोधनसुध्दा सुरू झाले होते.आधी कोरोना,मग टोळधाड,नंतर चक्रीवादळ,भूकंप अशा नैसर्गिक संकटांच्या मालिकेत सरोवराचे गुलाबी पाणी (pink water) आणखी कुठल्या संकटाचे संकेत देत आहे का ? या दिशेनेही काही जिज्ञासूंनी विचार करायला सुरुवात केली होती यावेळी जाणकारांच्या मते काही निष्कर्ष काढण्यात आले.त्यापैकीच एक पुढीलप्रमाणे-
उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर (lonar sarovar) हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.काही वनस्पती शास्त्रज्ञांच्या मते पाणी गुलाबी होण्याचे एक कारण म्हणजे हॅलोबॅक्टेरिया आणि शैवाल वनस्पती डुनालीला सॅलिनाची उपस्थिती असू शकते.
जे लोणार सरोवराप्रमाणे खारट वातावरणात आढळतात.ज्यात ‘कॅरोटीनोईड’ नावाचा रंगद्रव्य आहे जो गुलाबी रंग देऊ शकतो. आता,या शैवाल आणि हलोबॅक्टेरियाला सरोवरात उगवण्यास अचानक कशी चालना मिळाली हे संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
तर याच प्रकारे वातावरणातील बदलामुळे अनेक वेळा समुद्रातील पाणी सुध्दा गुलाबी रंगाचे पहायला मिळाले असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे त्यामुळे वातावरणातील बदलानंतर आणि पावसाचे पाणी या सरोवराला मिळाल्यानंतर या सरोवरातील पाण्याचा रंग पुर्वरत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात बाळाला मिळाले नवजीवन
संभाजी ब्रिगेडच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद- देवराव लुगडे
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});